🌟परभणी शहरात सत्काय फाउंडेशन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने तथागत गौतम बुद्ध जयंती उत्साहात साजरी...!


🌟यावेळी पंचशील नाट्य ग्रुपचे सादरीकरण पाहून परभणीकर भारावून गेले🌟


परभणी :-
परभणी शहरात सत्काय फाउंडेशन व डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली. जगाला शांतता हवी असेल तर बुद्धाचे तत्व स्वीकारावे लागतील... युद्धाने कटूता वाढते तर बुद्धाने प्रेम वाढते, या विचारांचा पंचशील नाट्य ग्रुप ने जागर घातला.पथनाटय व लेझीम सादरीकरणातुन तथागतांच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीचा प्रसार करण्यात आला. बुद्ध पौर्णिमा हा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो समतेचा, करुणेचा आणि शांततेचा जागर करणारा दिवस आहे. हे सादरीकरणातुन दाखवण्यात आले.

पंचशील नाट्य ग्रुपचे सादरीकरण पाहून परभणीकर भारावून गेले आयोजक संजय मुळे,माजी महापौर भगवान वाघमारे,ज्योतीताई बगाटे, कैलास काकडे, सुधीर साळवे, प्रदिप पुडंगे, सुदाम पैठण,कुणाल खाडे, महाराष्ट्र पोलीस मिलिंद कांबळे, आसाराम दवंडे , नवनाथ लोखंडे सर्वांनी पथकाचे कौतुक करुन पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पंचशील नाट्य ग्रुप पुर्णा जिल्हा परभणीचे संस्थापक अध्यक्ष प्रा बंडू गायकवाड,संयोजन विजय गायकवाड भिमा वाळवे भुषण भुजबळ यांनी सर्व परभणीकरांचे मनःपूर्वक आभार मानले.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या