🌟शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या वतीने करण्यात आले होते भव्य तिरंगा मोटारसायकल रॅलीचे आयोजन🌟
पुर्णा :- भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय सैन्य दलाने जे शौर्य गाजवले त्यांच्या शौर्याला नमन करण्यासाठी व शहिद झालेल्या विर जवानांना अभिवादन करण्यासाठी आज रविवार दि.११ मे २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजेच्या सुमारास शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्त्वाखाली भव्य तिरंगा मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पुर्णा-परभणी मार्गावरील झिरो टी-पॉइंट ते शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या मार्गावरुन आज रविवार दि.११ मे रोजी सकाळी ०९.०० वाजेच्या सुमारास भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते झिरो टी-पॉइंट,कृषी उत्पन्न बाजार समिती,छत्रपती संभाजी महाराज चौक,महाविर नगर, महात्मा बसवेश्वर चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक आदी मार्गावरुन मार्गक्रमण करीत महापुरुषांना अभिवादन करुन निघालेल्या भव्य तिरंगा रॅली जमा मस्जिद परिसरात पोहोचल्यावर येथील हजरत मस्तानशहा वली दर्गा येथे चादर चढविण्यात आली यावेळी असंख्य देशभक्त देशप्रेमी नागरिकांनी या तिरंगा रॅलीत सहभाग नोंदवला सदरील रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम,डॉक्टर विनय वाघमारे,ॲड.विशाल किरडे,पत्रकार जगदीश जोगदंड,माजी सैनिक मन्नूसिंह ठाकूर,डॉक्टर गुलाबराव इंगोले,नलबलवार सर,गणेश कदम,सुनील शिंदे,अंकित कदम,अक्षय कहाते,आदींसह असंख्य नागरिक सहभागी झाले होते.......
0 टिप्पण्या