🌟परळी वैजनाथ नगर परिषद मान्सून पुर्व स्वच्छता कामा बाबत ॲक्शन मोडवर.....!


🌟परळी नगर परिषदच्या स्वच्छता विभागाकडुन मान्सुन पुर्व स्वच्छता कामांना वेग🌟 

🌟शहरातील मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरू, नागरीकांनी सहकार्य करावे - मुख्याधिकारी 



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :
- परळी शहरात मान्सून पुर्व स्वच्छता कामा बाबत परळी नगर परिषद अक्शन मोडवर आली आहे. स्वच्छतासह मोठ्या नाल्यांची साफसफाई मोहिम सुरू झाली आहे. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन, कचरा आणि गाळ नाल्यात टाकू नये, जेणेकरून पावसाळ्यात पाणी व्यवस्थित रस्ता मिळवू शकेल आणि शहरात पूर येण्याची शक्यता कमी होईल.  परळी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडुन मान्सुन पुर्व स्वच्छता कामांना गती देण्यात आली आहे. जे.से.बी., ट्रॅक्टर आदी मशनरीसह स्वतंत्र मजुरांची नियुक्ती करुन साफसफई करण्यात येत आहे.  यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी केले आहे.  

               शहरात पावसाळापूर्व स्वच्छता कामाना गती दिली आहे.   शहरात अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये पाणी साचल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण व्हायची आशा ठिकाणी स्वच्छता सुरू करण्यात आली आहे.   नगरपरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे ॲक्शन मोडर आले आहेत. मान्सून पूर्व शहरातील नाले सफाईवर प्रशासनाने जोर दिला आहे.  शहरातील अनेक नाल्यांमध्ये गाळ काढण्याचे काम व सफाई नगर परिषदद्वारे करण्यात येत आहेत. 

        नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, उपमुख्यधिकारी संतोष रोडे व स्वच्छता विभाग शंकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागातील विलास केदारी, सुरेश वाल्मिकी, राजाभाऊ जगतकर, राजाभाऊ गायकवाड, जेसीबी चालक सिद्धार्थ कसबे, धनराज कसबे व सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या सहकार्याने पावसाळापूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. पावसाळ्यात शहरातील मोठे नाले आणि नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी येणार नाही. नागरीकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. 

           शहरातील उखळवेस ते सिमेंट फेक्ट्ररी, सरस्वती नदी गोपाळ टॉकीज ते सार्वजनिक समशान भूमी मलिकपुरा, पंचायत समिती नाथ रोड ते घरणीकर रोड, घरणीकर रोड ते हमालवाडी, साई नगर, सोमेश्वर नगर ते शारदा नगर, काळरात्री मंदिर ते घनशी नदी तसेच विविध भागातील नाल्या यासह शहरातील विविध छोट्या मोठ्या नाल्यांमधील गाळ व कचरा काढण्यात येत आहे. यासाठी दोन जेसीबी, सहा ट्रॅक्टरद्वारे व कर्मचार्‍यांच्यासह्याने साफसफई करण्यात येत आहे. पावसाळा सुरु होई पर्यन्त ही साफसफाई करण्यात येणार असुन या काळात शहरातील ज्या नाल्या तुंबल्या आहेत. त्यातील गाळ काढण्यात येणार आहेत. नागरिकांनी त्यांच्या परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे. तसेच, कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा आणि गाळ टाकू नये. तसेच, नाल्यांच्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे व नागरिकांनी आपला कचरा घंटागाडी मध्ये टाकावा असे आवाहन परळी नगर परिषदच्या स्वच्छता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या