🌟अशी माहिती तक्षशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी दिली🌟
परळी :- परळी शहरातील भीम नगर साठे नगर रमा नगर प्रबुद्ध नगर येथील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले असून दहावी बारावीनंतर काय या विषयावर मार्गदर्शन ही होणार असल्याची माहिती तक्षशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक वर्षापासून तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने परळी शहरातील भीम नगर साठे नगर रमा नगर व प्रबुद्ध नगर येथील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यांच्या पाठीवर कुणीतरी शाब्बासकीशी थाप मारावी जाने करून विद्यार्थ्यालाही याचा अभिमान वाटावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक 31 मे 2025 रोजी भीम नगर जगतकर गल्ली येथील माता रमाई आंबेडकर सभागृहात सायंकाळी ठीक पाच वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार असून त्यासाठी जास्तीत जास्त दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यांनी मार्क मेमो व पासपोर्ट फोटो 96 89 84 71 11 व 91 12 31 17 77 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावा व त्यांच्या पालकांनीही या कार्यक्रमास उपस्थित राहावे व मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा असेही आव्हान तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष साप्ताहिक मानपत्र चे संपादक वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या