🌟पुर्णा नगर पालिका प्रशासनाने घरपट्टी नळपट्टीसह सर्व वाढीवकर तात्काळ कमी करावे....!


🌟भारतीय जनता पक्षाची नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी🌟


पुर्णा :-
पुर्णा शहरातील नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यात सर्वार्थाने अपयशी ठरलेल्या नगर परिषद प्रशासनाने मनमानी पद्धतीने करवाडीचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या नोटीसा नागरिकांना देण्यात येत आहे त्यामुळे नगर परिषदेच्या या निर्णयाच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे नागरिकांना नगरपालिकेमार्फत मिळणाऱ्या नागरी सुखसुविधा सुरळीत मिळत नाही पंधरा पंधरा दिवस नगर परिषदेकडून पाणीपुरवठा होत नाही याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे नागरिकांना बाराही महिने सुरळीत स्वच्छ व निर्जंतुक पाणीपुरवठा नगर परिषद पाणीपुरवठा विभागाकडून केला जात नाही तरी देखील पाणीपट्टीत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे याशिवाय शहरातील स्वच्छता योग्य प्रमाणात होत नाही नगरपालिकेच्या कुठल्याही शाळा नसताना शिक्षण कर लादला जातो नगरपालिकेने कुठलेही वृक्ष लावले नाहीत तरी पण नागरिकांवर वृक्ष कर लादला जातो नगरपालिका प्रशासनाने सोयी सुविधा वेळेवर मिळत नाहीत तरीपण रझाकारी पध्दतीने घरपट्टीत वाढ केली आहे पुर्णा नगर पालिके मार्फत नागरिकांना योग्य त्या सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे नगरपालिकेने केलेली कर वाढ लोकांना मान्य नाही तरी नगरपालिकेने ही वाढीव कर रद्द करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी यांना एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

नगर परिषद मुख्याधिकारी यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर पुर्णा शहर भाजपा मंडळ अध्यक्ष गोविंद उर्फ राज ठाकर परभणी जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मीकांत कदम, जिल्हा उपाध्यक्ष हनुमान अग्रवाल, भारतीय जनता पक्ष ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अजय ठाकूर,भाजपा शहराध्यक्ष प्रशांत कापसे,प्रतिष्ठित व्यापारी राजेश धुत,बालाजी कदम ,मधुकर मुळे, राम पुरी  नाना चिटणीस,सोमनाथ पाळसकर, ओम यादव ,शेख गौस ,शंकर डहाळे,प्रवीण डहाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....


आपला नम्र 

गोविंद राज ठाकर 

शहर अध्यक्ष पूर्णा 

भारतीय जनता पार्टी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या