🌟भारताला बलुचिस्तानच्या BLA चं जाहीर समर्थन,युद्ध झालंच तर बलुच सैन्याचा मास्टरप्लॅन, पाकिस्तानला पश्चिमेकडून घेरणार🌟
1.पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या लढाईला स्वतःची लढाई बनवली ; भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची पत्रकार परिषदेत माहिती
2.भारताला बलुचिस्तानच्या BLA चं जाहीर समर्थन, युद्ध झालंच तर बलुच सैन्याचा मास्टरप्लॅन, पाकिस्तानला पश्चिमेकडून घेरणार ; दहशतवाद्याच्या मृतदेहासमोर लष्कराच्या उपस्थितीत कलमा पडला,मृत व्यक्ती निष्पाप असल्याचा दावा,पाकिस्तान तोंडावर आपटला ; परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींच्या लेकीसंदर्भात आक्षेपार्ह टीका ; महिला आयोग ट्रोलर्सवर संतापला,आपण सर्वांनी सभ्यता आणि संयमित वर्तणूक दाखवली पाहिजे,महत्त्वपूर्ण आवाहन
3.भारत-पाकिस्तान युद्ध थांबताच शेअर मार्केटमध्ये आनंदाला भरती, सेन्सेक्सची 2,975 अंकांनी उसळी, निफ्टीही सुस्साट ; शेअर बाजारात मोठी उसळी, डिफेन्स कंपन्यांचे शेअर्स सुस्साट सुटले, सेन्सेक्सची मोठी झेप
4.गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा तळ उध्वस्त; सी-60 जवानांच्या मोहिमेला यश, मोठा शस्त्रसाठा जप्त ; महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, कोम्बिंग ऑपरेशन सुरु
5.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी, सहकारात गैरप्रकार करुन सत्तेत येणाऱ्यांना सुतासारखं सरळ करा, 'सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण' परिसंवादात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वक्तव्य, शरद पवारांसोबत भर मंचावर एकमेकांशी संवाद ; समिती नेमून सहकारी संस्थांचा अभ्यास करा, नेमक्या अडचणी समजून घ्या, खासदार शरद पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती ; शरद पवारांना सहकारी कारखाने कमी झाल्याची खंत, फडणवीस म्हणाले, तिकडे प्रोफेशनल काम होत नाही, नुसती खोगीरभरती
6.कोल्हापुरात कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी रस्त्याच्या मुद्यावर एकत्र, काँग्रेस नेते सतेज पाटील आणि भाजप आमदार अमल महाडिक यांचं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन, दोघेही एकाच फ्रेममध्ये! ; काँग्रेस नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का, विश्वासू सहकारी शारंगधर देशमुख यांनी साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
7. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसह नाशिकला अवकाळी पावसाने झोडपलं, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस ; अवकाळी पावसाचा कहर! एकट्या नाशकातल्या 600 गावतील 14 हजार शेतकऱ्यांना फटका; राज्याला वळीवाच्या पावसाचा इशारा
8.दहावीच्या परीक्षेचा आज मंगळवार दि.13 मे रोजी दुपारी 1 वा. ऑनलाईन निकाल, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली
9.नागपूर जिल्ह्यातील सुरगाव शिवारात खाणीत पाच जणांचा बुडून मृत्यू ; वाघांची दहशत कायम! चंद्रपुरात गेल्या 72 तासांत 5 महिलांचा मृत्यू,ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण ; ऑनलाईन सुरा मागवला, स्वतःचा गळा चिरला; भोपाळ AIIMS मध्ये शिकणाऱ्या बीडच्या मुलाची पुण्यात आत्महत्या ; पुण्यात पिंपरी चिंचवड मध्ये 18 वर्षीय तरुणीची भररस्त्यात हत्या, बाईकवर आलेल्या दोघांनी घराखाली बोलावत मुलीवर केले सपासप वार ; आरोपी निघाला परप्रांतीय शेजारी , आरोपीचे व मुलीचे संबंध , वादातून केली हत्या
10.भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट करत दिली माहिती ; रन मशिन विराट कोहलीचे 5 महारेकॉर्ड्स... जे मोडणं अशक्यच; महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आसपासही नाहीत! ; "सिंहाचं काळीज असलेला माणूस! विल मिस यू चिकू..." विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर कोच गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया
11.ब्रिटिशांपासून लपवलेली शस्त्रं दशकांनी सापडली, महाबळेश्वरच्या विहिरीत 'इतिहास' गवसला, शिवकालीन ठेव्याशी साधर्म्य
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या