🌟पुण्यात शिवसेना शिंदेंचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या गाडीवर गोळीबार🌟
✍️ मोहन चौकेकर
1. आधुनिक खगोलशास्त्राचे जनक काळाच्या पडद्याआड, मराठी विद्वेतेचा मानदंड हरवला ; ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं 86 व्या वर्षी पुण्यात निधन ; इंदिरा गांधींनी परदेशातून भारतात बोलावून घेतलं, टीआयएफआरमध्ये कार्य, आयुका संस्था उभारणीत योगदान; जयंत नारळीकरांची प्रेरणादायी कारकीर्द
2. कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू, दीड वर्षीय चिमुरडीच्या मृत्यूने सारेच हळहळले ; रिक्षाला धडक देऊन कल्याणमधील उल्हास नदीत भलामोठा हायवा ट्रक कोसळला, ड्रायव्हर सुखरुप रिक्षातील महिलेचा मृत्यू
3. पुण्यात वादळी वाऱ्यासह धुव्वादार पावसाने भलंमोठे होर्डिंग कोसळलं; राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधारा, जालन्यात वीज पडून 4 जनावरं ठार ; मान्सून भारताच्या जवळ पोहोचला, केरळमध्ये पुढील 4-5 दिवसांत दाखल होणार
4. पुण्यात शिवसेना शिंदेंचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या गाडीवर गोळीबार; दुचाकीवरुन आलेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू ; वैष्णवी हगवणेंची हत्या नसून आत्महत्याच, आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना; पुण्यातील बावधन पोलिसांनी दिली माहिती
5. मी शपथ घेतो की...; अखेर छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; धनंजय मुंडेंच्याच खात्यावर वर्णी जवळपास निश्चित ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी तुम्हाला सभ्य माणसं मिळत नाहीत का? छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने अंजली दमानिया यांचा चिडून देवेंद्र फडणवीस यांना सवाल
5. अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत; छगन भुजबळांना मंत्रिपद मिळताच मनोज जरांगेंचा थेट उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल ; यह तो झाकी है, आता सुप्रिया सुळे यांना केंद्रांत मंत्रीपद मिळणार तर जयंत पाटील, रोहित पवार यांना राज्यात लवकरच मंत्रिपद मिळणार; छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच लक्ष्मण हाकेंचा दावा
6. मुंबईत कोरोनाचे 53 रुग्ण तर पुण्यामध्ये आढळला 1 रुग्ण ; रुग्णसंख्या वाढली तरी घाबरु नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन ; राज्याचं नवे गृहनिर्माण धोरण जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
7. केंद्रीय मंत्री किरण रिजीजूंचा उद्धव ठाकरेंना फोन, विदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळात ठाकरेंच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनाही स्थान ; डोंबिवलीतील जागेचा 7/12 प्रकाश आंबेडकरांच्या नावावर, पण बिल्डरने उभारली 7 मजली इमारत; KDMC महापालिकेकडून पाडकाम सुरू
9. गडचिरोलीत 36 लाखांचे बक्षीस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये होते सक्रिय ; जळगावमध्ये एसटीचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, भरधाव बसने चौघांना उडवले; 2 ठार 2 गंभीर जखमी
10. अभिषेक शर्मा अन् दिग्वेश राठी भर मैदानात भिडले; थेट बीसीसीआयचे उपाध्यक्ष मध्यस्थीसाठी धावले ; दिग्वेश राठीला अभिषेक शर्मासोबतचं भांडण भोवलं,राजीव शुक्लांच्या मध्यस्थीनंतर आयपीएलची मोठी कारवाई,थेट निलंबन
11.' हेरा फेरी 3' अर्ध्यात सोडल्यामुळे परेश रावल यांच्या अडचणी वाढणार? अक्षय कुमारनं धाडली 25 कोटींची लीगल नोटीस
12 इंद्रायणी नदीच्या पुररेषेतील 36 बंगले जमीनदोस्त; भाजपचे माजी महापौर जबाबदार असल्याचा आरोप, जाधव म्हणाले, दोन दिवसांत रहिवाशांची भरपाई मिळवून देऊ
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या