🌟राज्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी खुशखबर : घरकुल बांधकामासाठी मिळणार घरपोच मोफत वाळू....!


🌟आगामी पावसाळी अधिवेशनात तक्रार आल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल – महसूलमंत्री बावनकुळे

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील पंतप्रधान आवास योजनेसह विविध योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी राज्य सरकारने मोफत वाळू धोरण अंमलात आणले असून घरकुल बांधकामासाठी घरपोच मोफत वाळू मिळणार आहे. वाळू डेपोमधून वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले अधिकाऱ्यांनी कुठल्याही कामात चूक करू नये. आगामी पावसाळी अधिवेशनात तक्रार आल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी ३० लाख घरकुले दिली आहेत. या घरकुलांना मोफत वाळू देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारलेले आहे. मात्र, या घरकुलांना वाळू मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत यासाठी तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांची मदत घेऊन ग्रामविकास अधिकाऱ्यामार्फत सर्व घरकुल लाभार्थ्यांना घरपोच वाळू रॉयल्टीची पावती पोहच करणे आवश्यक आहे. त्याची नोंदही ठेवण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्र्यांसोबत तर तहसीलदारांनी आमदारांसोबत बैठक घेऊन त्यांच्या मागणीनुसार वाळूची निर्गती करणे आवश्यक आहे.

अधिकाऱ्यांनी आपल्या कामात कुठेही चूक करता कामा नये. महसूल संदर्भात यावेळी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात एकही तक्रार येता कामा नये. तक्रार आली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे वाळू निर्गती धोरणाच्या अंमलबजावणीबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात वित्त व नियोजन, मदत पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जैस्वाल, आमदार आशिष देशमुख, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या उपस्थितीत बैठक झाली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या