🌟पुर्णा शहरातील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय येथे सहाय्यता कक्षाची स्थापना....!


🌟पुर्णा तालुका समन्वयक म्हणून उमाशंकर मिटकरी यांची नेमणूक🌟 


पुर्णा
: पुर्णा शहरातील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय येथे इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश 2025/26 साठी सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे या सहायता कक्षचे समन्वयक म्हणून श्री मिटकरी उमाशंकर यांची नेमणूक करण्यात आली आहे पुर्णा तालुका समन्वयक म्हणून ते काम पाहतील त्यांचा संपर्क क्रमांक '9421384858' असा आहे. 

 अकरावी साठी प्रवेश नोंदणी प्रक्रिया ही दिनांक 21 मे 2025 पासून सुरू होत आहे ,तरी सन 2025- 26 साठी अकरावी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश नोंदणी करायची आहे, त्यांना अडथळा येऊ नये,तसेच प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महाविद्यालयांतर्गत कमिटी निर्माण करण्यात आली आहे, कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. के. राजकुमार असून  सचिव श्री. मिटकरी उमाशंकर ,तंत्रस्नेही श्री डावरे गिरीश व श्री. पर्लेकर राजेश म्हणून काम पाहतील या सहाय्यता कक्षाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा,असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के राजकुमार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या