🌟परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मूलीच्या लग्नासाठी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत....!


🌟एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत बालासाहेब जगतकर यांनी केली मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत🌟    

परळी :- परळी शहरातील तक्षशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मुलीच्या लग्नासाठी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली असल्याची माहिती तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव तथा वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी गेल्या दोन वर्षापासून परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था परळी शहरातील भीम नगर साठे नगर रमा नगर प्रबुद्ध नगर येथील मुलींच्या लग्नासाठी एक हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत पाच हजार रुपयाची मुलीच्या आई-वडीलास आर्थिक मदत करीत असून याचाच एक भाग म्हणून आज दिनांक १८/५/२०२५ रविवार रोजी परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील माता रमाई आंबेडकर सभागृहात जगतकर गल्ली येथील अंध व्यक्ती रवींद्र जगन्नाथ जगतकर यांच्या मुलीचा विवाह संपन्न झाला असून त्यानिमित्त तक्षशिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांच्या वतीने मुलीचे आई-वडील यांना एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करताना संस्थेचे मार्गदर्शक वसंतराव बनसोडे संस्थेचे सचिव तथा वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष प्रेम जगतकर भीम नगर जगतकर गल्ली जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक जगतकर युवक नेते अभिजीत कांबळे सौरभ आचार्य संकेत बनसोडे धनराज घाडगे राजेंद्र जगतकर दिनेश जगतकर  इत्यादीच्या हस्ते देण्यात आले असून या उपक्रमाबद्दल संस्थेचे कौतुक वराडी मंडळी कडून करण्यात आले असून पुढील कार्यास वधूवरास शुभेच्छा देण्यात आल्या असल्याची माहिती संस्थेचे सचिव तथा वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी दिली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या