🌟पुर्णा तालुक्यातील गौर येथील श्री सोमेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत संपादन केले घवघवीत....!


(श्री सोमेश्वर विद्यालय गौर येथून प्रथम क्रमांक आदिती जोगदंड आल्याने सत्कार करतांना संस्था उपाध्यक्ष मनोहरराव पारवे,एकनाथ जोगदंड,जनार्धन जोगदंड,विक्रम जोगदंड,देवराव जोगदंड)

🌟शाळेतील परीक्षेस प्रविष्ट झालेले एकूण विद्यार्थी 75,उत्तीर्ण विद्यार्थी 67 : यावर्षी शाळेचा निकाल 90% लागला आहे🌟


पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील गौर येथील श्री सोमेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेतील परीक्षेस प्रविष्ट झालेले एकूण विद्यार्थी 75,उत्तीर्ण विद्यार्थी 67,अनुत्तीर्ण विद्यार्थी 08 शेकडा निकाल 90% लागला आहे प्रथम क्रमांक आदिती जोगदंड 93.20% द्वितीय क्रमांक पूजा बेस 92.20% तृतीय क्रमांक वैभव कंधारे 87.80% घेतले आहे. विशेष प्रावीण्य 15,प्रथम श्रेणीत 21 ,द्वितीय श्रेणीत 24 उत्तीर्ण झाले आहेत.

श्री सोमेश्वर विद्यालयातील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला .उपस्थित संस्थेचे अध्यक्ष एन. बी .राजभोज , रंगनाथराव पारवे, केशवराव पारवे, मनोहर पारवे, मारोतराव थडवे, गणपत दुथडे ,नंदकुमार बोगळे ,मुख्याध्यापक अच्युत जोगदंड, सतिश गोरे, भिमराव ढगे, वैजनाथ पारवे, पंकज  मिठ्ठेवाड ,मंगेश पारवे यांच्या सह माता पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या