🌟विज कंपन्यामध्ये उच्च शिक्षित तांत्रिक कामगारांकरीता अंतर्गत भरती प्रक्रीया राबवा......!


🌟अशी माहीती केद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिली आहे🌟

नागपूर :– तिन्ही कंपनीमधील कार्यरत तृतीय व चतुर्थ श्रेणीतील अनेक तांत्रिक कामगारांनी विविध क्षेत्रातील (ईलेक्ट्रीकल व ईतर) अभ्यासक्रमामध्ये पदवी, पदविका (Diploma, Degree, AMIE ) प्राप्त केलेल्या आहेत. उच्च शिक्षित पदवी/पदविकाधारक तांत्रिक कामगारांकरीता Internal Notification नुसार पद भरती प्रक्रीया राबविण्यात यावी अशी मागणी तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने विज कपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या कडे निवेदनाव्दारे केली असल्याची माहीती केद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिली आहे.

संघटनेने अंतर्गत भरती प्रक्रिया राबवा अशी अनेक वेळा मागणी केली आहे तसेच या मागणी करीता संघटनेने अनेक वेळा राज्यव्यापी आंदोलन सुध्दा पुकारले होते (महापारेषण कंपनीने नुकतीच Internal Notification नुसार पद भरती प्रकीया राबविलेली आहे.) प्रशासनाने चर्चे वेळी नियमाप्रमाणे Classification and Recruitment Regulations प्रमाणे Internal Notification प्रकीया राबविण्यात येईल असे आश्वासित केले होते. वारंवार चर्चा होवुन व लेखी आश्वासन देवून सुध्दा महावितरण व महानिर्मिती कंपनीमध्ये उच्च शिक्षित तांत्रिक कामगाराच्या हिताचा निर्णय न होता फक्त वेळ काढूपणा अवलंब केला जात आहे. 

महावितरण/ महापारेषण कंपनीतील कनिष्ठ / सहाय्यक अभियंता पदे नियमाप्रमाणे Internal Notification नुसार पद भरती प्रकीया राबवुन Internal Notification नुसार पदभरती करावी, तिन्ही कंपनीतील कोणत्याही कंपनीमध्ये Internal Notification नुसार पदभरती प्रकीया राबविल्यास कंपनी भेद न करता तिन्ही कपनीमध्ये कार्यरत असलेल्या उच्च शिक्षीत पदवि/पदविका धारक तांत्रिक कामगाराना संधी देवुन उच्चशिक्षित तांत्रिक कामगारांना न्याय द्यावा. अन्यथा उच्च शिक्षित तांत्रिक कामगारांच्या न्यायीक मागणी करीता संघटनेला भविष्यात आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. अशा ईशारा तांत्रिक कामगार युनियन रजि. नं. 5059  केद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, उपाध्यक्ष बी.आर पवार, गोपाल गाडगे, सतिश भुजबळ, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस नितीन चव्हाण, शिवाजी शिवनेचारी, संजय उगले, केंद्रीय संघटक महेश हिवराळे, आर.आर. ठाकुर, अरूण यावले, राज्य सचिव आनंद जगताप, रघुनाथ लाड, प्रकाश निकम, कोषाध्यक्ष गजाननन अघम, मुख्य कार्यालय प्रतिनीधी दत्तु भोईर, प्रसिध्दी प्रमुख अनिल सरोदे, तांत्रिक टाईम्स संपादक सुनिल सोनवणे, विवेक बोरकर, विक्की कावळे, प्रदिप पाटील, प्रकाश वाघ, किरण कन्हाळे यांनी दिला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या