🌟सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश म्हणून भूषण रामकृष्ण गवई आज स्विकारणार पदभार....!


🌟न्यायमूर्ती भुषण गवई यांना ६ महिन्यांचा कार्यकाळ मिळेल🌟

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची नवे सरन्यायाधीश म्हणून निवड झाली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या नावाला काल मंगळवार दि.१३ मे २०२५ रोजी मंजुरी दिली न्यायाधीश भुषण गवई हे आज बुधवार दि.१४ मे २०२५ पासून सरन्यायाधीशपदाचा कार्यभार सांभाळतील गवई हे देशाचे ५२ वे सरन्यायाधीश असतील केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 'एक्स' वरून सांगितले की भूषण रामकृष्ण गवई यांची १४ मे २०२५ पासून सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

💫न्यायमूर्ती गवई यांना ६ महिन्यांचा कार्यकाळ मिळेल :-

न्यायमूर्ती गवई यांना ६ महिन्यांचा कार्यकाळ मिळेल. ते २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होतील. न्यायमूर्ती बी. आर. गवई यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. त्यांनी विविध न्यायालयांमध्ये आपली सेवा दिली आहे. २०१९ मध्ये त्यांना सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्वपूर्ण निकाल दिले आहेत.

💫सरन्यायाधीश भुषण गवई हे मूल्यांचे संरक्षण करतील :-

माझे उत्तराधिकारी न्या. बी. आर. गवई हे सर्वोच्च न्यायालयाची मूल्ये, अधिकार व मूळ संवैधानिक सिद्धांत कायम ठेवतील, असा विश्वास सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी व्यक्त केला.

💫सेवा निवृत्तीनंतर मी कोणतेही पद स्वीकारणार नाही - मावळते सरन्यायाधीश संजीव खन्ना

सेवा निवृत्तीनंतर मी कोणतेही सार्वजनिक पद स्वीकारणार नाही, अशी घोषणा मावळते सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केली. खन्ना यांचा सरन्यायाधीशपदाचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. न्या. यशवंत वर्मा वादाबाबत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मी कोणतीही गुप्तता पाळत नाही. न्यायाधीश तथ्याच्या आधारावर काम करतात. न्यायालयीन कामकाजात निष्पक्ष निर्णय घेणे व तार्किक दृष्टीकोन गरजेचा आहे. न्यायपालिका सकारात्मक आणि नकारात्मक पैलू पाहते. त्यानंतर तर्काच्या आधारावर निर्णय दिले जातात. भविष्यकाळ सांगतो, आम्ही जो निर्णय घेतला तो किती योग्य होता, असे त्यांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या