🌟पुर्णेतील शासकीय ग्रामीण रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा....!


🌟या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खराटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार जगदीश यांची उपस्थिती🌟 

पुर्णा :- पुर्णा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी आद्य परिचारिका फ्लोरेन्स नाइटींगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व परिचारिकांचा मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या सेवा कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खराटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड,डॉ.गजानन शिंदे,डॉ.नागेश देशमुख,डॉ.ऋषिकेश ठाकूर,डॉ.रेखा पारवे,डॉ.सुप्रिया राजगुरू यांची उपस्थिती होती. यावेळी जगदीश जोगदंड यांनी परिचारिकांच्या समर्पित सेवा कार्याचा गौरव केला या कार्यक्रमास फारुखी वाहेद,रवी वाघमारे,दत्ता भालेराव,चंद्रकांत कदम,विक्रम कापसे,कैलास वेदपाटील, सुनील वाघमारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सिंड्रेला झांबरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राजक्ता लाड यांनी केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या