🌟या शिबिरात रुग्णांना नोंदणी शुल्क हे केवळ १०० रुपये आहे🌟
डायबेटिक रेटिनोपॅथी ही एक गंभीर आजार असून, वेळेवर निदान आणि उपचार आवश्यक असल्याने नियमित डोळ्यांची तपासणी उपचार व मागोवा घेणे आवश्यक आहे असे हिंगोली येथील व्यंकटेश नेत्रालय व फेको अँड रेटीना केअर सेंटर चे संचालक व ज्येष्ठ नेत्रशल्यचिकित्सक डॉ.किशन लखमावार ह्यांनी म्हंटले आहे. अशा प्रकारचे शिबिर हिंगोलीत प्रथमच होत असल्याने परिसरातील नेत्र रुग्णांना आता मोठ्या शहरात जावून तपासण्या उपचार शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी वेळ श्रम पैसा अधिक खर्ची घालण्याची आवश्यकता नसल्याचं डॉ.प्रतिक लखमावार यांनी म्हणाले आहे. आता नवीन तंत्र ज्ञानासह नेत्ररुग्ण सेवा सुविधांचा मोठा लाभ गरजू रुग्णांना हिंगोलीतच होणार असून मागील २३ वर्षापासून व्यंकटेश नेत्रालय कडून दिल्या जात आहे. रुग्णांना आता फेको व रेटीना सर्जेन डॉ.प्रतिक लखमावार ह्यांच्या सेवेचा लाभ अत्याधुनिक संगणकीय मशिन्स द्वारे व्यंकटेश नेत्रालय हिंगोली येथे होणार असून गरजूनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासना कडून राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी केलं आहे.
या शिबिरात मधुमेही रुग्ण,गर्भवती महिलांमध्ये मधुमेह असलेल्यांनी, डोळ्यांमध्ये पांढरा धुरकटपणा,मधुमेह असणारे व अंधुकपणा जाणवणाऱ्यांनी, वयोवृद्ध, जोखीम गटातील रुग्णांनी सहभाग घ्यावा नाव नोंदणी व लाभ घेण्यासाठी, "९८२२१७५७५५ "वर संपर्क करावा अस आवाहन करण्यात आल आहे......
0 टिप्पण्या