🌟यामध्ये 'लष्कर-ए-तोयबा'चा म्होरक्या शाहीद गुट्टे याचा देखील समावेश आहे🌟
श्रीनगर : भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीर राज्यातील शोपियान जिल्ह्यात काल मंगळवार दि.१३ मे २०२५ रोजी झालेल्या चकमकीत धर्मांध राक्षसी प्रवृत्तीच्या 'लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा गोळ्या घालून खात्मा केला. यामध्ये 'लष्कर-ए-तोयबा'चा म्होरक्या शाहीद गुट्टे याचा समावेश आहे.
शोपियान जिल्ह्यातील शुकरू केलर परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घालून शोधमोहीम हाती घेतली. तेव्हा दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले.
सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झालेले दहशतवादी 'लष्कर-ए-तोयबा'चे होते. त्यापैकी दोन जणांची नावे शाहीद कुट्टे आणि अदनान शफी अशी आहेत. तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. शाहीद कुट्टे हा शोपियान जिल्ह्यातील चोटपोरा हीरपोराचा असून मार्च २०२३ मध्ये तो दहशतवादाकडे वळला. तो 'लष्कर-ए-तोयबा'चा म्होरक्या होता.
कुट्टे याचा अनेक दहशतवादी त्याचप्रमाणे राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभाग होता. हीरपोरामध्ये भाजपच्या सरपंचाच्या हत्येतही त्याचा सहभाग होता. गेल्या महिन्यात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी प्रशासनाने कुट्टे याचे घर जमीनदोस्त केले होते. शफी हा वांदुना मेलहोरा परिसरातील असून त्याचा एका कामगाराच्या हत्येत सहभाग होता.....
0 टिप्पण्या