🌟जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.रवींद्र सिंह परदेशी यांना पाहुणे म्हणून माठातील आंबा लोणचे भेट देऊन करण्यात आला सन्मान🌟
पुर्णा (वृत्त विशेष):- वादळी वाऱ्यासह अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या आंबा पिकाचे झालेली नुकसान पाहून सांत्वन करण्यासाठी व धीर देण्यासाठी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी व कृषी विभा विभागाचे अधिकारी कर्मचारी माखणी येथील जनार्धन आवरगंड यांच्या आंबा बागाची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर उपस्थित झाले.
त्यांनी ओंकार गृह उद्योग ,लाकडी तेल घाणा, गोबर गॅस, आंबा फळबाग, यासह माठातील गावरान आंबा लोणच्याची कार्य पद्धती पाहून खचून न जाता ऊर्जा मिळण्यासाठी मार्गदर्शन केले.उपस्थित उपस्थित रवींद्र सिंह परदेशी , ताडकळस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन मोरे, उदय चंदेल ,अतुल ठेबरे,अविनाश पवार , गावांतील नागरिक, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. बालासाहेब आवरगंड, मीरा आवरगंड. जनार्धन आवरगंड यांची आदी ची उपस्थिती होती.
******************************************** 💫शेतकरी कष्टकरी खूप काही करतात पण निसर्ग असे हिरावून का नेतो हेच कळत नाही - मिरा आवरगंड
महीला शेतकरी आंब्याच्या बागावर आंबा लोणचे करून मागणीनुसार अधिकारी कर्मचारी यांना माठातील गावरान लोणचे दरवर्षी घरपोच करतो आम्ही कोरोना मध्येही घरी बसलो नाही आम्ही घरपोच लोणचे पोहोचित केले परंतु वादळी वाऱ्याने अवेळी पावसाने आंबा पूर्ण गळून पडला आहे म्हणून यावर्षी लोणचं बऱ्याच जणांना देऊ शकणार नाही म्हणून खूप दुःख होत आहे. शेतकरी कष्टकरी खूप काही करतात पण निसर्ग असे हिरावून का नेतो हेच कळत नाही....
0 टिप्पण्या