🌟या प्रकरणी नानलपेठ पोलिस स्थानकात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल🌟
परभणी : परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील बाळासाहेब ठाकरे कमान परिसरात एका युवकावर भर रस्त्यात धारदार शस्त्रांनी वार करीत त्याची चौघांनी निर्घृण हत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दि.०९ मे २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास घडली या घटने प्रकरणी चार जणांविरुध्द नानलपेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्घृण हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव विशाल विनायक आर्वीकर वय ३२ वर्ष असे असून विशाल हा शुक्रवार दि.०९ मे २०२५ रोजी रात्री ०९.०० ते ०९.३० वाजेच्या सुमारास शहरातील जिंतूर रस्त्यावरील बाळासाहेब ठाकरे कमान परिसरात परिचितांना बोलत थांबला होता यावेळी तोंडाला बांधलेले चौघेजण मोटरसायकलवर धारदार शस्त्र घेऊन त्या ठिकाणी आले. त्यांनी विशालवर धारदार शस्त्र आणि हातोड्याने सपासप करत त्याला जमिनीवर पाडले. त्यानंतर चारही आरोपींनी मोटरसायकलवर स्वार होऊन तेथून पळ काढला. यावेळी नागरिकांचा मोठा जमाव घटनास्थळी उपस्थित झाला. त्यानंतर विशाल आर्वीकर यास तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून विशाल आर्वीकरचा मृत्यु झाल्याचे सांगितले. या प्रकरणी वर्षा गिराम यांच्या फिर्यादीवरून नानालपेठ पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान पोलिसांनी पसार झालेल्या चार आरोपींपैकी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी दिनकर डंबाळे, पोलिस निरिक्षक कामठेवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक खज्जे हे करीत आहेत.....
0 टिप्पण्या