🌟पुर्णा नदीकाठावरील नागरीक मदतीसाठी धावल्यामुळे अनर्थ टळला🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातल्या कानडखेड निळा शिवारातील पुर्णा नदीपात्रातून विवाह सोहळ्यासाठी जाणार्या पाहुण्यांची एक नाव एकाच बाजूने वजन अधिक झाल्याने नदीपात्रात उलटल्याची घटना काल मंगळवार दि.२० मे २०२५ रोजी दुपारी ११.०० ते १२.०० वाजेच्या सुमारास घडली पुर्णा नदीकाठावरील शेतकरी व नागरीकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतल्यामुळे नावेतील पाच ते सहा जण सुदैवाने बचावले.
तालुक्यातील निळा येथील रहिवासी संभाजी सुर्यवंशी आणि प्रभाकर सुर्यवंशी यांच्या कन्येचा दि.२० मे २०२५ रोजी विवाह सोहळा होता या समारंभासाठी सातेफळ, कात्नेश्वर, आहेरवाडी,नांदेड आदी भागातून पाहुणे येत होते संक्षिप्त मार्ग म्हणून कानडखेड मार्गे पूर्णा नदी ओलांडण्याचा पर्याय निवडण्यात आला होता दरम्यान पाहुणे तराफ्याने नदीपात्र पार करत होते. या वेळी दोन दुचाकींसह पाच-सहा जण नावेत होते. नावेत एकाच बाजूने वजन अधिक झाल्याने नाव काही अंतर जाताच उलटली. अचानक झालेल्या या घटनेमुळे नावेत असलेले सर्वजण थेट पाण्यात कोसळले. काही क्षणात आरडाओरड सुरू झाली. घटनेच्या वेळी नदीकिनारी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि नावाड्यांनी प्रसंगावधान राखत मदतीला धाव घेतली. सर्वजणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यामध्ये दुचाक्याही पाण्यातून बाहेर काढण्यात आल्या. नाव नदीपात्राच्या मध्यभागी उलटली असती, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र, नदीच्या काठाजवळच ही दुर्घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला......
0 टिप्पण्या