🌟अहिल्यादेवी होळकर रथयात्रेत जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रथयात्रा दिंडी समितीने केले आहे🌟
नांदेड - लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव ते चौंडी (जि. अहिल्यानगर) अशी भव्य रथयात्रा व दिंडीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती रथयात्रा चालक तथा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे महाराज यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी रथयात्रा काढण्यात येते. माळेगाव यात्रा येथून ता.२७ मे रोजी यात्रेला प्रारंभ होणार आहे. ३० एप्रिलपर्यंत रथयात्रा असणार आहे. परचंडा हनुमान मंदिर परळी वैजनाथ, अंबाजोगाई, चाकरवाडी, मन्मथ स्वामी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थळ अहिल्यासृष्टी, अहिलेश्वर महादेव या तीर्थस्थळांना पाहण्यासाठी भाविकांनी सहभागी होऊन भजन, कीर्तन, व्याख्यान, सत्संगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संभाजीराव धुळगुंडे महाराज (94234 41646),अॅड. शिवाजीराव हाके, इंजि. बालाजी काळे, मुरहरी कुंभारगावे, नरहरी नीळकंठ उराडे, संजीव म्हेत्रे, परसराम वडजे, गोविंद गोरे, कांचन शेळके व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रथयात्रा दिंडी समितीने केले आहे.......
0 टिप्पण्या