🌟पुर्णा तालुक्यातील माखणी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य क्रिकेट चषक स्पर्धा संपन्न.....!


🌟या स्पर्धेत स्वर्गीय बालाजी कदम माहेर संघाने फायनल सामना जिंकून प्रथम पारितोषिक पटकावले🌟

पुर्णा (दि.१४ मे २०२५) - पुर्णा तालुक्यातील माखणी येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि.०१ मे २०२५ पासून भावी सरपंच क्रिकेट चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये एकूण ०९ क्रिकेट संघांनी सहभाग घेतला या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक कै.बापूराव धूळशेटे यांच्या स्मरणार्थ पिराजी धूळशेटे यांच्या तर्फे रुपये ३०,०००/- व द्वितीय पारितोषिक सचिन आवरगंड यांच्या तर्फे रुपये १६०००/- तर तृतीय पारितोषिक श्रीविष्णू आवरगंड यांच्या तर्फे रुपये ७०००/-त्याचबरोबर इतर उत्तेजनार्थ बक्षीस गावकऱ्यांकडून ठेवण्यात आलेली होती यामध्ये दिनांक १३ मे २०२५ रोजी अंतिम सामना झाला या सामन्यात स्वर्गीय बालाजी कदम व डी आर कन्स्ट्रक्शन ताडकळस या दोन संघांमध्ये झाला यामध्ये प्रथम स्वर्गीय बालाजी कदम माहेर संघाने फायनल सामना जिंकून प्रथम पारितोषिक पटकावले द्वितीय पारितोषिक डी.आर.कन्स्ट्रक्शन ताडकळस या संघाला मिळाले आणि तृतीय पारितोषिक देवा सी.सी.लोहगाव या संघाला मिळाले.या क्रिकेट लीग मध्ये पंच म्हणून नवनाथ आवरगंड प्रल्हाद आवरगंड सदाशिव आवरगंड धनंजय आवरगंड यांनी काम पाहिले सर्व विजेत्या संघाचे अभिनंदन माखणी गावकऱ्यांनी केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या