🌟विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झालेल्यांमध्ये बहुसंख्य रोजंदारी कामगारांचा समावेश🌟
अमृतसर : पंजाब राज्यातील अमृतसर जिल्ह्यातील मजिठिया परिसरात विषारी गावठी दारू पिल्यामुळे तब्बल १७ रोजंदारी कामगारांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली असून प्रकृती गंभीर असलेल्या ०६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असे काल मंगळवार दि.१३ मे २०२५ रोजी पोलिसांनी सांगितले. विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झालेल्यांमध्ये बहुसंख्य रोजंदारी कामगार आहेत भांगाली,पाटलपुरी,मरारी कलान आणि थेरेवाल गावात हे मृत्यू झाले आहेत.
या निष्पाप कामगारांच्या मृत्यूला जे कारणीभूत आहेत त्यांची गय केली जाणार नाही, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले आहे. तर विरोधकांनी आप सरकारवर टीका केली असून मान सरकार दारू माफियांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी झाल्याचे म्हटले आहे सध्या पोलीस पथक त्या दारूच्या स्रोताचा शोध घेत आहेत. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, रविवारी संध्याकाळी ही दारू एका ठिकाणाहून खरेदी करण्यात आली होती. त्यातील काही व्यक्तींचा मृत्यू सोमवारी सकाळीच झाला होता, मात्र पोलिसांना याची माहिती दिली गेली नव्हती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत......
0 टिप्पण्या