🌟मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली मागणी🌟
परभणी (दि.०९ मे २०२५) - दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागाचे व्यवस्थापक प्रदीप कामले हे आज परभणी रेल्वे स्थानकावर तपासणीसाठी आले असता स्थानकातील विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून त्वरित प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. याबाबत माहिती अशी की दक्षिण मध्य रेल्वेचे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले व त्यांची टीम आज मराठवाड्यातील परळी, गंगाखेड आणि परभणी या स्थानकाची तपासणी करण्यासाठी आले होते. दुपारी साडेतीन वाजता परभणी रेल्वे स्थानकावर त्यांचे आगमन होताच मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, रुस्तुम कदम, कदिर लाला हाश्मी, माणिक शिंदे बलसेकर , विठ्ठल काळे आदींनी त्यांची भेट घेऊन परभणी स्थानकावरील विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणल्या त्यात अमृत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत परभणी स्थानकाचे पुनर्निर्माणधीन काम खूप संथ गतीने सुरू आहे त्याबद्दल नाराजी व्यक्त करून हे काम द्रुतगतीने सुरू करावे, परभणी स्थानकावर नवीन पादचारी पुलावर लिफ्टचे काम पूर्ण होऊन चार महिने झाले तरी अद्यापही ती लिफ्ट सुरू करण्यात आली नाही ती त्वरित सुरू करणे, नवीन पादचारी पुलाला स्थानका बाहेरचा रस्ता बंद केला आहे तो खुला करणे, जनशताब्दी एक्सप्रेस ला परभणी स्थानकावर सकाळी साडेसहाच्या दरम्यान काउंटर तिकीट उपलब्ध करून देणे, परभणी स्थानकावर सध्या मोबाईल व सामान चोरीच्या घटनात वाढ झाली आहे त्यामुळे पुरेसा पोलीस बंदोबस्त देणे, स्थानकावर भिकाऱ्यांचा बंदोबस्त करणे तसेच प्राईम पार्किंग मध्ये प्रवाशांची होणारी लूट थांबवणे अश्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या सर्व मागण्यावर आपण विचार करून तत्काळ निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी मराठवाडा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या शिष्टमंडळात दिले. यावेळी स्टेशन मास्तर अरविंद इंगोले,दमरे कार्यालयातील अधिकारी सूर्यवंशी आदी उपस्थित होते.....
0 टिप्पण्या