🌟भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ शिवसेने (शिंदे)च्या गटाच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन🌟
मुंबई : जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथील पर्यटकांवर पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारानंतर भारतीय सैन्य दलाच्या वतीने 'ऑपरेशन सिंदूर'चे करण्यात आली या कारवाईत राक्षसी प्रवृत्तीच्या दहशतवाद्यांसह दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला देखील भारतीय सैन्य दलाने सडेतोड उत्तर देऊन भारताची ताकद दाखवून दिली या कारवाई दरम्यान अनेक सैनिकांना देखील बलिदान द्यावे लागले भारतीय सैन्य दलाचे मनोबल आणावे याकरिता भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ शिवसेने (शिंदे)च्या गटाच्या वतीने उद्या रविवार दि.१८ मे ते २४ मे २०२५ पर्यंत राज्यात सर्वत्र भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
पाकिस्तान पुरस्कृत राक्षसी प्रवृत्तीच्या धर्मांध दहशतवाद्यांनी जम्मू व काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी पर्यटकांवर अमानुषपणे हल्ला केला या हल्ल्यात देशभरातील २८ पर्यटकांचा मृत्यू झाला यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश असून दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. भारतीय सैन्य दलाने केलेल्या कारवाईचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
राजकीय पक्षांकडून तिरंगा यात्रेचे आयोजन करत सैन्य दलाच्या बरोबर संपूर्ण देश उभा आहे, असा संदेश दिला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनेही राज्यात १८ ते २४ मे पर्यंत सलग भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.....
0 टिप्पण्या