🌟पुर्णा येथील स्वा.सै.सुर्यभानजी पवार महाविद्यालयात बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.....!


🌟दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांनी यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली🌟 

पुर्णा (दि.०८ मे २०२५) :- पुर्णा येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात बारावीच्या यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांनी यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

कला व विज्ञान शाखेतील यशस्वी विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विज्ञान शाखेतील  ९५.२३ % निकाल लागला असून कला शाखेचा ६६.६६ % निकाल लागला आहे महाविद्यालयातील एकुण निकाल  ७७.१९ टक्के  लागला आहे. कला शाखेतील नंदिनी गणेश साखरे या विद्यार्थिनीने ७२.८३ % गुण घेतले आहेत तर दिव्या भागवत शिंदे या विद्यार्थिनी ७२.१७ % गुण, अविनाश कोंडीबा वरकड या विद्यार्थ्यांने ६९.३३% गुण घेतले आहेत तर विज्ञान शाखेतील अभियोग गंगाधर नरवाडे या विद्यार्थ्याने ७७ % टक्के गुण घेतले असून वैभव रामचंद्र वैद्य याने ७२.८३ % तर शेजल गोविंद खोंडे या विद्यार्थीनीने ७२.१७ गुण घेतले आहेत.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून संस्थेच्या उपाध्यक्ष प्रा डॉ सुनीता पवार (काळे) आणि  महाविद्यालयाचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी विद्यार्थ्यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले.  तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी  प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार आणि प्रा.डॉ. सुनीता पवार (काळे) मॅडम यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी महाविद्यालयाच्या निकालाची यशस्वी परंपरा कायम राखल्यामुळे संस्थेच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा.सुजाता घन, प्रा.अलका दुधगोंडे  यांचाही पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. 

यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. कुऱ्हे, डॉ.भारत चापके ,कर्मचारी वरीष्ठ लिपिक सूर्यकांत भोसले,  कनिष्ठ लिपिक दत्ता कदम ,गिरधारी कदम आदी मान्यवर, पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या