🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟140 कोटींच्या देशाने सीमेवर सू सू केली तरी पाकिस्तान वाहून जाईल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य🌟

1. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला व निवडणूक आयोगाला निर्देश  ; देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखे झाले आहे, जे लोक त्यात चढले आहेत, ते दुसऱ्यांना आत येऊ द्यायला तयार नाहीत; ओबीसी आरक्षणाच्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिपण्णी  

2. महाराष्ट्रात आज बुधवार दि.07 मे रोजी 16 ठिकाणी युद्धाची मॉकड्रील,केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने उचललं पाऊल  ; कसा युद्धसराव म्हणजे आम्हाला बंदुका देणार आहात का? एकदा काय ते आर या पार होऊन जाऊ द्या; संजय राऊत कडाडले 

3. राज्य सरकारच्या चौंडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय; अहिल्यादेवी स्मृतीस्थळासाठी 681 कोटींचा आराखडा, मेडिकल कॉलेज अन् तीर्थस्थळ म्हणून विकास होणार ; मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय, तुळजापूर मंदिरासाठी 1865 कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा  

4. भारत-पाकिस्तान युद्धाच्या एक पाऊल आणखी जवळ, इकडे मॉकड्रील तिकडे बॉर्डरवर पाकिस्तानचा अंदाधुंद गोळीबार ; आम्ही भारतासाठी काहीही करण्यास तयार,' पहलगाम हल्ल्यावर अमेरिकेनं दिली स्पष्टोक्ती, पाकिस्तानला भरला सज्जड दम! ;चीनने पुन्हा रंग दाखवला, पाकिस्तानला पाठिंबा दिला

5. 140 कोटींच्या देशाने सीमेवर सू सू केली तरी पाकिस्तान वाहून जाईल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य 

6. आठवडाभरापासून तापमान 45 अंशांपर्यंत, अकोल्यात अचानक पावसाच्या हजेरीने दिलासा; चिमुकल्यांनी पावसात भिजत  लुटला आनंद ; अवकाळीसह गारपिटीचा तडाखा, मराठवाड्यात बळीराजावर पुन्हा संकट 

7. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचा न्यायालयात सुटकेसाठी अर्ज, धनंजय देशमुख म्हणाले,  सर्व आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात ठेवण्यात यावे ; बीड जिल्ह्यात धक्कादायक प्रकार,  पोलीस कर्मचारी चक्क पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या घरात गांजा ओढत बसला  

8. घरगुती वादातून पतीने आठ वर्षाच्या मुलासमोरच केला पत्नीचा खून, पुण्यातील धक्कादायक घटना ; सोलापुरातील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी  

9. Indian Idol 12 चा विजेता पवनदीप ICU मध्ये, हात-पाय फ्रॅक्चर, डोक्याला गंभीर दुखापत  ; अंबानींच्या लेकीचा Met Gala 2025 मध्ये  रॉयल अंदाज; गळ्यातल्या शाही हारावर खिळल्या नजरा, फोटो 

10. क्रिकेट तुमच्या घरची जहागिरी नाही, पैशासाठी NRI बनलेल्यांनी मला शिकवू नये, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा हल्लाबोल  ; जर एखादा खेळाडू 40 किंवा 45 वर्षांच्या वयातही चांगली कामगिरी करत असेल तर तो खेळत राहील, रोहित-विराटच्या भविष्याबद्दल गौतम गंभीरचं भाष्य                                          

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या