🌟जगामध्ये शांती आणि सद्भभाव आणण्याच सामर्थ्य महामानव तथागत भगवान बुद्धांच्या विचारात आहे......!


🌟वसंतराव नाईक कृषी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांचे प्रतिपादन🌟 


पुर्णा :
पुर्णा शहरांमध्ये सार्वजनिक भीम व बुद्ध जयंती मंडळाच्या वतीने अखिल भारतीय भिख्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत पय्यावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सार्वजनिक भिम बुद्ध जयंती मंडळाच्या वतीने आज सोमवार दि.१२ मे २०२५ रोजी सकाळी ०७.३० वाजेच्या सुमारास येथील बुद्ध विहार समोरील जिल्हा परिषदेच्या प्रशस्थ प्रांगणामध्ये महामानव तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून महा बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नांदेड खुरगाव येथील भदंत पय्याबोधी थेरो व श्रामनेर बाल भिक्खू संघ यांची उपस्थिती होती. 


भदंत पय्याबोधी थेरो यांच्या हस्ते बुद्ध विहारावरील पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर नीता गायकवाड त्यांची उपस्थिती होती भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांनी महा बुद्ध वंदनेचे पार्श्वभूमी विशद केली महा बुद्ध वंदना पार पडल्यानंतर प्रमुख अतिथी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर इंद्र मणी यांनी संबोधित करताना सांगितले की संपूर्ण जगामध्ये शांतता सुव्यवस्था प्रेमभाव निर्माण करण्याचे सामर्थ्य तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारात आहे.


संपूर्ण जगाने बुद्ध विचारसरणी आचरणात आणल्यास जगामध्ये वैरभाव शिल्लक राहणार नाही माझी जन्मभूमी उत्तर प्रदेश सारनाथ बुद्धगया श्रावस्ती या ठिकाणाला मी नेहमीच भेटी देत असतो तेथे गेल्यानंतर मनाला शांती आणि कमालीचे समाधान प्राप्त होते डॉ.उपगुप्त महा थेरो यांचं धम्मकार्य बुद्ध धम्म प्रचार प्रसारासाठी करत असलेले त्यांचे प्रयास प्रशंसनीय आहे डॉक्टर उपगुप्त महाथेरो आपल्या प्रमुख संबोधनांमध्ये प्रकाश टाकताना म्हणाले जगाला युद्ध नको आहे बुद्ध विचाराची गरज आहे यावेळी सार्वजनिक भीम बुद्ध जयंती  मंडळ व बुद्ध विहार समितीच्या वतीने कुलगुरू डॉक्टर इंद्र मनी यांचा बुद्ध मूर्ती शाल पुष्पहार बुद्ध विहार लिंबूनि स्मरणिका देऊन येथे सत्कार करण्यात आला. 

महा बुद्ध वंदना पार पडल्यानंतर वाद्य वृंदासह सजवलेल्या बुद्ध मूर्तीची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या मिरवणुकीची सांगता झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे जयंती मंडळाचे सल्लागार प्रकाश कांबळे जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तम खंदारे व जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तम भैया खंदारे यांनी केले यावेळी समता सैनिक दलाने ध्वजाला मानवंदना दिली यावेळी जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तम खंदारे सल्लागार प्रकाश कांबळे यांनी जयंतीचे औचित्य साधून मनोगत व्यक्त केले. 

भदंत पयावंश यांच्या आशीर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली महा बुद्ध वंदना यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळ बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेली महिला मंडळ यांनी विशेष प्रयत्न केले बोधाचार्य त्र्यंबक कांबळे उमेश बाराटे अतुल गवळी अमृत कऱ्हाळे किशोर ढाकरगे यानी पार पडला सूत्रसंचालन श्रीकांत शेवाळे यांनी केले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या