🌟भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 'ऑपरेशन सिंदूर'चे कौतुक.....!

 


🌟राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीनही सैन्य दल प्रमुखांनी घेतली भेट🌟

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर  केलेल्या ऑपरेशन सिंदूरचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुक्तकंठाने कौतुक केले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर भारतीय सैन्यांच्या तीनही दलाच्या प्रमुखांनी राष्ट्रपती भवन येथे द्रौपदी मुर्मू यांची भेट घेवून या कारवाईची माहिती दिली.जम्मू-काश्मीर येथील बैसरन येथील पर्यटनस्थळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी बेच्छुट गोळीबार करुन २६ निरपराध पर्यटकांचा बळी घेतला होता. 

यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डड्यांवर ऑपरेशन सिंदूर द्वारे कठोर कारवाई केली. या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानची दाणादाण उडवली. त्यानंतर आज भारतीय सैन्य दलाचे सीडीएस जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख, अडमिरल दिनेश त्रिपाठी आणि वायुसेना प्रमुख एपी सिंह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांना माहिती दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले. तसेच सशस्त्र दलांचे देखील अभिनंदन केले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या