🌟राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी स्पष्टीकरण🌟
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी मृत्यू प्रकरणात दोषी असेल तर मला फासावर लटकवावा पण बदनामी करु नका अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. वैष्णवीच्या लहान बाळाला तीच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर तालुकाध्यक्ष तथा माजी आ. राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे या महिलेने हुंड्यापोटी २ कोटीच्या मागणीच्या तगाद्यावरुन राहत्या घरात आत्महत्या केली. याप्रकरणी शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीचे वळ आणि जखमा दिसून आल्या आहेत. यावरुन पोलीसांनी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे.
सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता. त्या प्रकरणात राजकीय दबाव असल्याच्या चर्चा होत्या, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे राजेंद्र हगवणेसोबत जवळचे संबंध असल्याने त्यांना पाठिशी घातल्याच्या आरोप केला जात आहे. याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, तुम्ही अनेक जण मला लग्नाला बोलावता. मी शक्य असेल तर येण्याचा प्रयत्न करतो. मी एखाद्या लग्नाला गेलो आणि नंतर त्याच्या सुनेने वेडेवाकडे केलं, तर त्याला अजित पवार काय संबंध आहे. ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती कळल्यावर पिंपरीच्या पोलीस आयुक्तांना फोन करुन सांगितले की, कोणी का असेना कारवाई करा लग्नाला गेलो म्हणून आम्ही सांगतो का सूनेशी असं वागा म्हणून असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला पाहिजे. जर अजित पवार दोषी असतील तर अजित पवारला फासावर लटकावा. माझा त्यात काय संबंध असेल तर कारवाई करा. उगाच बदनामी केली जाते. मला सांगितले गाडीची चावी द्यायला सांगितली. मी देता ना पण विचारले. स्वखुशीने देत आहात की जबरदस्तीने देत आहात असंही विचारलं होतं. असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत असंही अजित पवारांनी म्हटलं आहे......
0 टिप्पण्या