🌟भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये युद्धविराम करून आम्ही संभाव्य अणुयुद्ध टाळले ?


🌟अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब दावा : ट्रम्प यांच्या दाव्याबाबत भारताची असहमती🌟

वॉशिंग्टन :- भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये युद्धविराम करून आम्ही संभाव्य अणुयुद्ध टाळले. अमेरिकेने पाकिस्तानदरम्यान भारत-युद्धविराम करण्यासाठी मदत केली. आता दोन्ही देशात कायमस्वरुपी युद्धविराम होईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले.

भारत-पाकदरम्यान झालेल्या शस्त्रसंधीचे श्रेय घेताना ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानकडे मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्रे आहेत. तुम्ही युद्धविराम न थांबवल्यास आम्ही व्यापार रोखू,अशी धमकी मी त्यांना दिली. माझ्या सरकारने युद्धविराम करण्यास मदत केली. भारत आणि पाकिस्तानचे नेतृत्व भक्कम व ताकदवान आहे. त्यांच्याकडे परिस्थितीचे गांभीर्य समजण्याची ताकद, बुद्धी व संयम आहे. आम्ही त्यांना मदत केली.

💫युद्धविराम करत असाल, तरच व्यापार करू :-

तुम्ही युद्धविराम करत असाल तरच आम्ही तुमच्यासोबत व्यापार करू, असे सांगितल्याने आता युद्ध थांबले आहे, आम्ही दोन्ही देशांसोबत व्यापारी संबंध अधिक मजबूत करू. यामुळे दोन्ही देशांना आर्थिक लाभहोऊ शकतो आणि युद्धाची शक्यता आणखी कमी होईल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.

💫ट्रम्प यांच्या दाव्याबाबत भारताची असहमती :-

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानाने शस्त्रसंधी न केल्यास त्यांच्याविरोधात व्यापार बंद करू, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी केले. पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी करताना व्यापाराबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती, असा खुलासा भारताच्या सूत्रांनी केला आहे. ९ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर 'वर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. तेव्हा व्यापाराचा कोणताही संदर्भ नव्हता, असे भारताने स्पष्ट केले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी ८, १० मे रोजी, तर १० मे रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी चर्चा केली. तेव्हा व्यापाराबाबत कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता, असे सूत्र म्हणाले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या