🌟सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले🌟
सेलू (दि.03 मे 2025) - विविध स्पर्धांमध्ये,उपक्रमांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंतांचा सन्मान करणे,त्यांना प्रोत्साहन देणे हे प्रशासनाचे कर्तव्य असते.शासन विविध स्पर्धा,उपक्रम राबवते त्यात सर्वजण अहोरात्र परिश्रम करून स्पर्धेत यश मिळवतात अशा गुणवंतांच्या पाठीवर थाप देणे हे आमचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत यांनी केले.
01 मे रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात यश मिळवलेल्या शाळा,विविध शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी,प्रशिक्षण दिलेले सुलभक यांच्या सरकारचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर उमेश राऊत यासह गटविकास अधिकारी अमितकुमार मुंडे,जेष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी गजानन वाघमारे,केंद्रप्रमुख एकनाथ जाधव,मायादेवी गायकवाड,प्रकाश सुरवसे,सुभाष शिंदे,संगीता जोशी,सोनूले,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष अमोल निकम आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत सन2023-24 आणि सन 2024-25 या दोन वर्षात विजयी झालेल्या प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक,तालुक्यात विविध शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले विद्यार्थी,प्रशिक्षण देणारे सुलभक असलेले शिक्षक यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी गणेश अकलोड,रेवणआप्पा साळेगावकर यांनी मनोगत व्यक्त करून शिक्षण विभागाने घेतलेल्या सत्कार कार्यक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा ताजने व सुनीता काळे यांनी केले.आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक भुजंग थोरे, जनार्दन कदम,अरुण राऊत,रमेश मरेवार,किरण राऊत,अश्विनी आमले, माधव गायकवाड,दत्ता काळे आदींसह शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.......
0 टिप्पण्या