🌟राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ बी वर खताने भरलेला ट्रक फसला ; रस्ता कामाकडे अधिकारी,ठेकेदाराचे दुर्लक्ष.....!


🌟वाहनधारकांसह नागरीकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण🌟 

पाथरी :- पाथरी तालुक्यातून जाणाऱ्या एनएच ५४८ बी या राष्ट्रीय महामार्गाचे टेंडर जाऊन ही ठेकेदाराने पावसाळ्या पुर्वी किमान खड्डे बुजवने अपेक्षित असतांना ठेकेदार आणि या महामार्गाचे अधिकारी कमालीचे दुर्लक्ष करत असल्याने सोमवारी दुपारच्या सुमारास सोनपेठ कडून पाथरी कडे खत घेऊन जाणारा ट्रक विटा येथील जिल्हा परिषदेच्या शाळे समोर फसून बसल्या ने या महामार्गावर पावसाळ्याच्या दिवसात कशी स्थिती असेल याची कल्पनाच नकेलेली बरी अशी संतप्त भावना नागरीक आणि वाहन धारक व्यक्त करत आहेत.

देवगाव फाटा ते सोनपेठ तालुक्यातील धामोनी फाट्या पर्यंत जवळपास ७१ किमी अंतराच्या एनएच ५४८ बी या राष्ट्रीय महामार्गा साठी विविध नेते, नागरीक यांच्या मागणी आणि पाठपुराव्या नंतर केंद्र सरकारच्या वतीने केंद्रिय महामार्ग वाहतूक मंत्री ना. नितिनजी गडकरी यांनी  साडेपाचशे कोटी रुपयां वर निधी देत या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे एप्रिल महिण्यात टेंडर ही देण्यात आले परभणी येथील आर बी घोडके कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम मिळाले असून. अजून ही ठेकोदाराने या महामार्गाच्या डागडूजीचे देखील काम सुरू न केल्याने वाहन धारक आणि परिसरातील नागरीकां मधून संताप व्यक्त होत आहे दोन दिवसा पुर्वी या भागात हलका अवकाळी पाऊस झाल्याने या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या भल्या मोठमोठ्या खड्यां मध्ये पाणी साचले होते. अशा खड्डेमय रस्त्या वरुन मोठी कसरत करत वाहनधारक वाहने चालवत नेतात.दर दिवशी छोटे मोठे अपघात होत असतात तर वाहनांच्या पार्टचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. 

सोमवारी सोनपेठ कडून पाथरी कडे अर्धवट खताने भरलेला ट्रक क्र एम एच ३० एव्ही ०१२६ दुपारी साडे बाराच्या सुमारास विटा बु. लिंबा दरम्यान जि प शाळे समोर महामार्गावर फसला. त्या मुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. अजून पावसाळ्याला सुरुवात ही झाली नाही. हा महामार्ग  दळणवळणा साठी महत्वाचा मानला जातो. दर वर्षी पावसाळ्यात या महामार्गावर वाहन फसण्याच्या घटना घडत असतात. फसलेली वाहने क्रेन,जेसीबी मशीन लाऊन ओढली जातात. पण आता या राष्ट्रीय महामार्गा साठी शेकडो कोटींचा निधी उपलब्ध होऊन निविदा मंजूर झाली असल्याने संबंधीत आर बी घोडके कंपनी ने पावसाळ्या पुर्वी किमान खड्डे भरून वाहतुक तरी सुरळीत कशी राहिल या साठी काम सुरू करणे अपेक्षित असतांना ठेकेदार कंपनी आणि संबंधित अधिकारी ही या महामार्गा कडे फिरकतांना दिसत नसल्याचे या भागातील सामाजिक कार्यकर्ते, नागरीक सांगत आहेत.

या विषयी नेत्यांच्या पाठपुराव्या कडे ही अधिकारी,ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने केंद्रिय महामार्ग मंत्री ना नितिनजी गडकरी साहेबांनी विषेश लक्ष देऊन संबंधित ठेकेदार,अधिकारी यांची कानऊघडणी करावी अशी मागणी वाहनधारक आणि नागरीकां मधून पुढे येत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या