🌟भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित भगवान बुद्ध जयंती निमित्त समता सैनिक दलाच्या वतीने पंचशील ध्वजास मानवंदना🌟
पुर्णा :- पुर्णा शहरातील डॉ आंबेडकर नगर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आज सोमवार दि.१२ मे २०२५ रोजी सकाळी ०७.४५ वाजेच्या सुमारास भारतीय बौद्ध महासभा परभणी दक्षिण व पुर्णा तालुका व शहर शाखा यांच्या वतीने महाकारुणिक सम्यक समबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६९ व्या जयंती निमित्त सर्व आजी माजी पदाधिकारी महिला मंडळ व तसेच समता सैनिक दलाच्या वतीने पंचशील ध्वजास मानवंदना देण्यात आली आणि भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संरक्षण उपाध्यक्ष केशव महादू मकासरे यांची कन्या गौतमी केशव मकासरे व गायकवाड साहेब यांनी समता सैनिक दलात प्रवेश केल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे अध्यक्ष तुकाराम ढगे जिल्हा सरचिटणीस गौतम दीपके व तालुका अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड तसेच शहराध्यक्ष उमाजी बाऱ्हाटे व महिला मंडळ व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले......
0 टिप्पण्या