🌟त्यांच्या सेवानिवृतिबद्दल निमित्त आयोजित सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.के.केंद्रेकर हे होते🌟
यावेळी कल्याण भरोसे व त्यांच्या पत्नी सुनीताताई भरोसे यांचा भगवानराव शेळके आणि गोविंदराव रोडे यांच्या वतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्यातील एका टप्पा पूर्ण करून नवीन इंनिंगची सुरवात असते शिक्षित सेवानिवृतांनी समाजसेवेसाठी आपले पुढील आयुष्य वेचावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी प्रा.धनजकर, एस. बी. जाधव, जी. एन. आरमाळ, नारायण वाघ, महेश काळदाते यांनी शुभेछापर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. ए. सोळंके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण भरोसे यांनी केले. या कार्यक्रमास गांधी विद्यालयातील निवृत्ती रेखडगेवार, भास्कर सुरवसे, मारुती पांचाळ, माणिक लोहट, खंडोजी ढोले, शिवाजी चिंतलवाड, रामेश्वर वानरे, राम जाधव, सुभाष ढगे, पंडितराव शिंदे, रामदास हुडके, मनोहर गाडगे, भारत कदम, मारुती कोंढरे, शंकर वाचावार आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंत भरोसे यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिक्षक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते........
0 टिप्पण्या