🌟तर जांब आंधमध्ये चौघे जण गंभीर जखमी🌟
✍️शिवशंकर निरगुडे (हिंगोली)
हिंगोली :- हिंगोली शहरासह जिल्हाभरात शनिवार दि.१७ मे २०२५ रोजी दुपारच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला दरम्यान सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे शेतात विज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला तर जांब आंध येथे चौघे जण गंभीर जखमी झाले या शिवाय हत्ता व खडकी येथे एकूण तीन गायी दगावल्याची घटना देखील घडली आहे.
या शिवाय सेनगाव तालुक्यातील जांब आंध येथे शेतात वीज कोसळून रुख्मीना मनोहर बंदुके, अंकिता संतोष बोडखे, संतोष किशन बोडखे, नंदाबाई किसन बोडखे जखमी झाले आहेत. अंकिता बोडखे ह्या गरोदर आहेत. या सर्वांना उपचारासाठी सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. रुख्मीना यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविले आहे. तहसीलदार देवराव कारगुडे यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, सेनगाव तालुक्यातील खडकी येथे एक गाय दगावली, तर हत्ता येथे गोशाळेजवळ वीज कोसळल्यामुळे दोन गायी दगावल्या आहेत. हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथे दिगंबर बेले यांच्या घरावरील टिन पत्रे उडून गेली. यामध्ये एका टीनपत्रामुळे बैल जखमी झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी माहिती घेतली असून जखमींवर तातडीने औषधोपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.....
0 टिप्पण्या