🌟शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये आनंद भरोसे जिल्हाप्रमुख पदावर निवड🌟
परभणी : शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार परभणी जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर आनंद भरोसे यांची निवड करण्यात आली आहे.
परभणी व जिंतूर विधानसभा मतदारसंघ हे आपले कार्यक्षेत्र राहील असे या पत्रातून म्हटले आहे हिंदुर्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल व शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेवून कार्य कराल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान आनंद भरोसे यांनी पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर विश्वास टाकल्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले शिवसेना पक्षबांधणीसह ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याकरीता आपण कटीबध्द राहु अशी ग्वाहीही त्यांनी दिली.......
0 टिप्पण्या