🌟याप्रसंगी श्री गुरु अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर यांची प्रमुख उपस्थिती🌟
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती श्री गुरु अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर,श्री गुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, श्री गुरु सिध्दलिंग शिवाचार्य महाराज देवनीकर उपस्थित होते, प्रास्ताविक काशीनाथ धुमाळ तर मानिक आप्पा धुमाळ, प्रा.शिवलिंग नागापुरे, सुभाष आप्पा नित्रुडकर, डॉ.सिध्देश्वर हालगे, सिध्दलिंग धुमाळ, अनेक शिष्य मंडळींचे मनोगत व्यक्त केले,चर्चा अंती अति विशेष किर्तनकार शिव संप्रदाय असो वा वारकरी संप्रदाय आमंत्रित करणे तसेच पहिल्या दिवशी जगद्गुरू पंचाचार्य अड्डपालखी व महासभा तर दुसरे दिवशी पंचाचार्य व शिवाचार्य महाराज मंडप पुजा व दर्शन महासोहळा या दोन दिवस सर्व राजकीय मंडळी आमंत्रित करणे, स्थानिक आमदार राजेश दादा विटेकर यांनी जबाबदारी स्वीकारली आहे ती सोनपेठकर वासीयांनी सोबत राहुन निमंत्रण समिती स्थापन करावी, सर्व शिष्य मंडळी यांनी आपल्या आपल्या गावी परस्पर बैठका घेऊन गुरुवर्यांना बोलवून आर्थिक मदत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून प्रत्येकाचा हिस्सा लाभला पाहिजे, मोठा कार्यक्रम एक ते दिड कोटी खर्च असुन, श्री नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ १४० गावात शिष्य मंडळी आहेत, सढळ हाताने मदत करणार्यांनी समोर आले पाहिजे, सोनपेठ शहरवासीयांनी पुढाकार घेऊन पंच जगद्गुरु यांना आमंत्रित करण्यासाठी समिती स्थापन करावी तसेच सर्व धर्मीय समाज बांधव, सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी व मित्र मंडळ तसेच सामाजिक संघटनांना सोबत घेऊन विवीध समित्याची निवड करुन, ज्यांना त्यांना जबाबदारी वाटप करणे, हा कार्यक्रम माझा आहे हे जाणून सर्वांनीच तन मन धन लावून काम करण्याची गरज आहे, जगदिश बुरांडे यांनी या महासोहळ्या साठी जागा उपलब्ध करून देण्याचे कबूल केले, गुरुवर्यांचा जो पहिला पट्टाभिषेक सोहळा पुन्हा या रोप्य महोत्सवी वर्षात पहायला मिळणार आहे, थोर आई वडीलांनी पुत्र दान दिलेला आहे त्यांचा एक प्रकारची कृतज्ञता म्हणून हा श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त पंच जगद्गुरू तसेच १०१ शिवाचार्य महाराजांच्या दर्शनाचा लाभ सोनपेठकरांना होणार आहे, सूत्रसंचालन बालाजी चिल्लरगे यांनी तर प्रास्ताविक काशिनाथ धुमाळ व आभार प्रा.करबसप्पा पोपडे यांनी मानले, यावेळी उपस्थित सर्व शिष्य मंडळी, श्री नंदिकेश्वर महीला भजनी मंडळ, श्री नंदिकेश्वर विचार मंच, विरशैव समाज बांधव व श्री नंदिकेश्वर मठ संस्थान प्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.......
0 टिप्पण्या