🌟पुर्णा शहरामध्ये सामूहिक महा बुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन....!

 


🌟यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ.इंद्रा मनी यांची उपस्थिती🌟 

अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो व भदंत पयावंश त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळाच्या वतीने दिनांक 12 मे 2025 सोमवार सकाळी सात वाजून 30 मिनिटांनी जिल्हा परिषद शाळेचे मैदान बुद्ध विहार समोर भदंत उपाली थेरोनगर पूर्णा या ठिकाणी आयोजित केलेले आहे. 

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक मराठा वाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू प्रोफेसर डॉ. इंद्रा मनी व सन्माननीय जिल्हाधिकारी मा. रघुनाथ गावडे यांची उपस्थिती लाभणार आहे सोमवार 12 मे 2025 रोजी सकाळी सात वाजून 45 मिनिटांनी बुद्ध विहार पूर्णा येथे महामानव तथागत भगवान बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन व पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण भिक्खू पय्या बोधी थेरो खुरगाव नांदेड यांच्या हस्ते होईल. 

सकाळी ठीक आठ वाजता पूजनीय भिक्खू संघाच्या हस्ते महा बुद्ध वंदने सुरुवात होईल यावेळी प्रमुख उपस्थिती भिकू शील रत्न थोर नांदेड भिक्खू सुभुती थेरो नांदेड भिक्खू संघपाल थेरो नांदेड भिक्खू पयावंश पुर्णा भंते पय्यासार भंते पैयावंत व श्रद्धेय भिखु संघ यांची उपस्थिती लाभणार आहे सकाळी नऊ वाजता बुद्ध विहारा पासून बुद्ध मूर्तीचे वाद्य वृंदासह धम्म मिरवणूक काढण्यात येईल बुद्ध विहार स्टेट बँक ऑफ इंडिया महात्मा बसवेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक किंग कॉर्नर पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा येथे मिरवणुकीचे विसर्जन होईल. 

सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णा कृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण व अभिवादन पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण माननीय उत्तम खंदारे सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते होईल त्यानंतर त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल वरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळ बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा शाखा व समता सैनिक दल शाखा पूर्णा व पूर्ण शहरातील सर्व धम्म सेवाभावी महिला मंडळ शहरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या