🌟नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहेब गुरुद्वारात १२५ भाविकांच्या समुहाने केले अमृतपान....!

 


🌟यात पंजाब, हरियाणा,राजस्थान आणी इतर ठिकाणच्या भाविकांचा समावेश होता🌟

नांदेड :- इंग्लंड येथे कार्यरत सेवा भावी संस्था मिडलैंड लंगर सेवा समिती तर्फे प्रोत्साहित १२५ लोकांनी गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुरसाहेब येथे उपस्थित होऊन अमृतपान स्वीकारलं. यावेळी गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी आणी पंजप्यारे साहिबान यांनी अमृतपान करणाऱ्या पुरुष आणी स्त्रियांना शीख धर्माची शिकवण अंगीकार करण्याचे आवाहन केले.

मिडलैंड लंगर सेवा समिती नावाची संस्था इंग्लंड,अमेरिका आणी कॅनडा येथे धार्मिक आणी सामाजिक उपक्रम राबविते. त्यात दरवर्षी हजुरसाहेब नांदेड येथे गरीब आणी सामान्य शीख भाविकांना आणून त्यांना अमृतपानाची दीक्षा देण्यात येते. वरील संस्थेचे सी.ई.ओ. स. रणधीरसिंघ त्यांचे सहायक स. भूपेन्द्रसिंघ, संस्थेचे भारतातील प्रमुख स. तेजीन्दरसिंघ (चंडीगढ़), स. हरविंदरसिंघ (पठानकोट), स. बलजीन्दरसिंघ (पटिआला) हे दि. १ मे रोजी नांदेडला पोहचले.दि.०२ मे रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान त्यांनी भविकांसोबत गुरुद्वारात उपस्थित होऊन विशेष अमृतपान कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवली. अमृतपानसाठी प्रस्तुत भाविकांनी खालसा पंथाच्या तत्वानुसार पंचककरांचे धारण केले. यात पंजाब, हरियाणा,राजस्थान आणी इतर ठिकाणच्या भाविकांचा समावेश होता........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या