🌟शहरातील रायगड कॉर्नर येथे शांतता रॅलीचे उदघाटन पूज्य भदंत प्रज्ञानंद बोधी पाल,पो.नि.दिपक बोरसे यांच्या हस्ते संपन्न🌟
सेलू (दि 14 मे 2025) - संपूर्ण विश्वाला शांतता,मानवता व समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2587 व्या जयंती निमित्त सेलू येथे सोमवार दि.12 मे 2025 रोजी शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रायगड कॉर्नर येथे रॅलीचे उदघाटन पूज्य भदंत प्रज्ञानंद बोधी पाल, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद सावंत,पत्रकार तथा जेष्ठ नेते अशोक अंभोरे,के.व्ही.वाघमारे,प्रा.के.डी.वाघमारे,एस.के.रणखांबे,संयोजन समिती अध्यक्ष प्रकाश भालेराव, उपाध्यक्ष नरहरी काकडे, सचिव विनोद धापसे व सर्व कार्यकारिणी सदस्य आणि उपासक उपसिका यांच्या उपस्थितीत पार पडला. शुभ्र वस्त्र परिधान करुण, हातात मेणबत्ती व पंचरंगी धम्म ध्वज घेऊन सेलूतील गायत्री नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, भीम नगर, गणेश नगर, समता नगर, शाहू नगर, सर्वोदय नगर, आदी भागातील शेकडो धम्म बंधू भगिनींनी रॅलीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. रॅलीमध्ये बुद्धांच्या मूर्तीसोबतच आयु. अर्चना गायकवाड यांनी तयार केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सम्राट अशोक यांचा जिवंत देखाव्याने सेलूकरांना आकर्षित केले.
समारोप प्रसंगी पूज्य भदंत प्रज्ञानंद बोधी पाल यांनी समुदयास त्रिशरण, पंचशील दिले बुद्ध वंदनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी सूत्रसंचालन दादाराव ताजने व हर्षवर्धन सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नरहरी काकडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व मार्गदर्शक यांनी सहकार्य केले.....
0 टिप्पण्या