🌟अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत मोठी चूक मध्यरात्री अज्ञात महिला थेट घुसली घरात सुरक्षरक्षकांचा वेढा भेदून महिला घरात🌟
✍️ मोहन चौकेकर
1) वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! अखेर वैष्णवीचं बाळ कस्पटे कुटुंबियांच्या ताब्यात; अज्ञात व्यक्तीने फोन करुन दिलं बाळ ;हगवणेंच्या मोठ्या सूनेचीही हादरवणारी कहाणी, वैष्णवीचा पती शशांक हगवणेकडून वहिनी मयुरी जगतापला मारहाण, मयुरीच्या भावाने दाखवला CCTV ; हगवणे कुटुंबीयांकडून माझ्या मुलीलाही मारहाण, करिष्मा अन् शशांककडून सर्वाधिक त्रास; मयुरी जगताप यांच्या आईचा खळबळजनक आरोप ; पुण्यात आणखी एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; 22 वर्षीय महिलेनं संपवलं जीवन, सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल
2) मी दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडली भूमिका, राजेंद्र हागवणेंची पक्षातून हकालपट्टी ;लग्नाच्या वेळी मला कल्पना दिली असती तर मी लग्नच होऊ दिलं नसतं, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वैष्णवीच्या वडिलांना फोन; म्हणाले, वैष्णवीला न्याय मिळवून देणार
3) वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! वैष्णवीचे मामासासरे पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांचा धाक दाखवून दोन्ही सुनांवर अत्याचार; अंजली दमानियांचा दावा रुपाली चाकणकरांना आयोगाचे अध्यक्षपद कोणत्या निकषावर दिलं? सुषमा अंधारेंचा सवाल ; काही विरोधक घटना घडल्यावरच जागे होतात, माझं नाव घेतलं म्हणजे तुमची बातमी होते, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंवर टीका
4) मोदी का दिमाग थंडा है, लेकीन लहू गरम है; राजस्थानमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा ; मी नाशिकचा बालक, पालक कोण होईल त्याची काळजी का करता? मंत्री छगन भुजबळांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या ; जागा वाटप, युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी करु नका; महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचा पक्षातील नेत्यांना कानमंत्र
5) धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड, ठाकरे गटाचे नेते अनिल गोटेंचा आरोप ठरला खरा, अर्जुन खोतकरांनी फेटाळले आरोप ; मी खोटा आरोप करत असेल तर सरकार तुमचंय, मला अटक करा, ठाकरे गटाचे नेते अनिल गोटेंचं शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांना ओपन चॅलेंज
6) ईडी सर्व मर्यादा ओलांडून संविधान आणि संघराज्य रचनेचे उल्लंघन करत आहे’ सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीच्या कारभारावर अत्यंत कडक शब्दात ताशेरे ; एखाद्याच्या विचारसरणीसाठी त्याला जेलमध्ये टाकू शकत नाही, आरएसएस नेत्याच्या हत्येच्या आरोपीला जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी
7) गुगलची मदत अन् विषारी फुलांचा शेक, मुख्याध्यापिका पत्नीनं दोन विद्यार्थ्यांच्या मदतीने शिक्षक पतीला संपवलं; मृतदेह जंगलात टाकला आणि पुन्हा जाळला, धक्कादायक घटनेनं यवतमाळ हादरलं ; आधी पार्सल देऊन गेला, एकटी महिला बघून डिलिव्हरी बॉय परत आला अन् नको तिकडे हात लावून गेला; मुंबईच्या अंधेरीत धक्कादायक प्रकार समोर
8) वातावरणात बदल, पुढील 6 ते 7 दिवस देशभरात तुफान पाऊस पडणार, भारतीय हवामान विभागाची माहिती ; महाराष्ट्रासाठी पुढचे 36 तास महत्त्वाचे, अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; पूर्वमान्सून झोडपणार
9) अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत मोठी चूक, मध्यरात्री अज्ञात महिला थेट घुसली घरात, सुरक्षरक्षकांचा वेढा भेदून महिला घरात घुसल्यानं खळबळ ; साऊथ सुपरस्टार धनुष बनणार 'मिसाइल मॅन', माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा
10) इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अंडर-19 संघाची घोषणा, मुंबईचा 17 वर्षांचा पोरगा आयुष म्हात्रे झाला टीम इंडियाचा कर्णधार, वैभव सूर्यवंशी जाणार लंडनला
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या