🌟या रॅलीचे उदघाटन : भन्ते प्रज्ञानांद बोधी,तहसीलदार शिवाजी मगर,पो.नि.दिपक बोरसे यांच्या हस्ते🌟
सेलू (दि.11 मे 2025) - सेलू येथे उद्या दि 12 मे सोमवार रोजी बुद्ध जयंती निमित्त शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल विश्वाला शांततेचा, मानवतेचा व समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या 2587 व्या जयंयी निमित्त सेलू येथे सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव समिती सेलूच्या वतीने शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या रैलीप्रसंगी रॅलीचे उदघाटन : भन्ते प्रज्ञानांद बोधी, तहसीलदार शिवाजी मगर, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, उपप्राचार्य डॉ. महेंद्र शिंदे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
12 मे रोजी सायं. 6.00 वाजता रॅलीची सुरुवात रायगड कॉर्नर येथून होईल आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बुद्ध वंदनेनंतर सांगता होईल. रॅलीमध्ये सर्व समाज बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी होण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
0 टिप्पण्या