🌟पुर्णेतील स्वा.सै.सुर्यभानजी पवार महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची यशाची परंपरा कायम.....!


🌟शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये कला शाखेचा ६६.६६ % निकाल लागला असून विज्ञान शाखेतील ९५.२३ % निकाल लागला🌟


पुर्णा :
- पुर्णा शहरातील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची यशस्वी परंपरा या वर्षीही कायम राहिली आहे. कला व विज्ञान शाखेतील यशस्वी विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये कला शाखेचा ६६.६६ % निकाल लागला असून विज्ञान शाखेतील  ९५.२३ % निकाल लागला आहे.


महाविद्यालयातील एकुण निकाल  ७७.१९ टक्के  लागला आहे. कला शाखेतील नंदिनी गणेश साखरे या विद्यार्थिनीने ७२.८३ % गुण घेतले आहेत तर दिव्या भागवत शिंदे या विद्यार्थिनी ७२.१७ % गुण, अविनाश कोंडीबा वरकड या विद्यार्थ्यांने ६९.३३% गुण घेतले आहेत तर विज्ञान शाखेतील अभियोग गंगाधर नरवाडे या विद्यार्थ्याने ७७ % टक्के गुण घेतले असून वैभव रामचंद्र वैद्य याने ७२.८३ % तर शेजल गोविंद खोंडे या विद्यार्थीनीने ७२.१७ गुण घेतले आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून महाविद्यालयाचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, अध्यक्ष, गुलाबराव कदम, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा.सुजाता घन, प्रा.अलका दुधगोंडे, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या