🌟सोलापूर येथील सेंट्रल टेक्सटाइल कारखान्यात लागलेल्या आगीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय....!

 


🌟अतिधोकादायक रासायनिक कारखान्यांचे ऑडिट करण्यात येणार🌟

मुंबई : सोलापूर येथील सेंट्रल टेक्सटाइल कारखान्यात लागलेल्या आगीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता एमआयडीसीतील अतिधोकादायक, धोकादायक आणि रासायनिक कारखान्यांचे विशेष पथकाद्वारे ऑडिट करण्यात येणार असल्याचे कामगारमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी सांगितले.

सोलापूरच्या सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या