🌟शिवसेना (शिंदे) गटाच्या परभणी लोकसभा प्रमुखपदी धैर्यशील उर्फ राजू कापसे यांची निवड.....!


🌟उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने कापसे पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले🌟

परभणी : परभणी जिल्ह्यातील जेष्ठ शिवसेना नेते तथा माजी जिल्हाप्रमुख राजू उर्फ धैर्यशील कापसे यांची शिवसेनेच्या परभणी लोकसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


        शिवसेनेचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने कापसे पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. परभणी लोकसभा मतदारसंघ हे आपले कार्यक्षेत्र राहील असे या पत्रातून म्हटले आहे. हिंदुर्‍दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल व शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेवून कार्य कराल, असा विश्‍वास या पत्राद्वारे व्यक्त करण्यात आला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या