🌟पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील राजर्षी शाहु विद्यालयातील सहशिक्षक पी.पी. कानगुले यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न....!


🌟संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.मोहनराव मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खाली सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न झाला🌟     

पुर्णा [दि.०२ मे २०२५] :- पुर्णा तालूक्यातील आहेरवाडी येथील  राजर्षी शाहू विद्यालयातील सहशिक्षक पी. पी.कानगुले हे आज आपल्या नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम काल ०१ मे २०२५ रोजी विद्यालयातील प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.मोहनराव मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खाली घेण्यात आला. पर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव सौ रजनीताई भगत [मोरे],शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब भालेराव,इंदिरा गांधी हायस्कूलचे प्राचार्य पंडीत रणवीर,प्रा.सुरेश मोरे व्यासपीठावर उपस्थित होते. 

यावेळी सेवानिवृत्त शिक्षक पी.पी.कानगुले व त्यांचा सुविद्य सहचरणी सौ.मिनाक्षी ताई कानगुले याचां सत्कार प्राचार्य डाॅ.मोहनराव मोरे व सौ रजनीताई भगत याचां हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नानासाहेब भालेराव यानीं केले यावेळी प्रा पंडीत रणवीर  यानीं आपले मनोगत व्यक्त केले  व तसेच प्राचार्या रजनीताई भगत,सौ.मीनाक्षी कानगुले याची समयोचित मनोगते व्यक्त केली गेली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदिप कदम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबन बगाटे , गंगाधर सोनटक्के,सुनिल पारवे,बबन पारवे, दत्तात्रेय गंगौञे ,संदिप विश्वासराव  ,सत्यम खडागळे,  देवानंद भारती ,प्रा सतीश भालेराव ; प्रकाश महाजन  मारोती मुंडे  लहाने मामा, आदिनी विशेष परिश्रम घेतले शेवटी आभारप्रदर्शन प्रा उत्तमराव मोरे यानीं केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या