🌟अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तात्यांची फुकट फौजदारी : भारताच्या अंतर्गत बाबीत दखल🌟
नवी दिल्ली : भारत पाकिस्तान या दोन देशांनी सोबत डिनर करावे असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सौदी अरेबियात युएस सौदी गुंतवणूक मंचाच्या कार्यक्रमात बोलतांना केले. ट्रम्प यांच्या वक्तवयाने भारतात पुन्हा राजकीय टीका-टिप्पणी सुरुझाली आहे जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथील बैसरन येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी स्थळांना लक्ष्य केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने देखील काश्मीरमध्ये लष्करी कारवाई केली. दोन-तीन दिवस भारत पाकिस्तान या दोन देशां दरम्यान सुरु असलेल्या संघर्षात शनिवारी रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा करुन भारताच्या अंतर्गत बाबीत दखल देणारे वक्तव्य केले होते.
यावरुन विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष केले आहे. या संदर्भात वाद सुरु असतांनाच आज सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या उपस्थितीत झालेल्या यूएस सौदी गुंतवणूक मंचाला डोनाल्ड ट्रम्प संबोधित करत होता. दोन अण्वस्त्रधारी शेजारी राष्ट्रांमधील संभाव्य अणुयुद्ध टाळण्यात अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. काही दिवसांपूर्वीच माझ्या प्रशासनाने भारत आणि पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक शस्त्रसंधी घडवून आणली. यामध्ये आम्ही व्यापाराचा वापर शस्त्र म्हणून केला. मी दोन्ही देशांना म्हणालो मित्रांनो, चला काहीतरी व्यापार करूया. अण्वस्त्रांचा नव्हे, तर तुम्ही अतिशय कौशल्याने बनवलेल्या वस्तूंचा, असे सांगून ते म्हणाले, दोन्ही देशांमध्ये खूप ताकदवान आणि समजूतदार नेते आहेत. त्यामुळेच हे सर्व थांबले. आशा आहे की अशीच स्थिती राहील. या दोन देशांनी आता एकत्रित डिनर करावे असा सल्ला त्यांनी दिला आहे. यापूर्वीच भारत सरकारने ट्रम्प यांचे दावे कायम फेटाळलेच आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक यांच्यातील परस्पर चर्चेतून शस्त्रसंधी करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका नव्हती, असे परराष्ट्र मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे भारत आणि पाकिस्तान मध्ये मध्यस्थी करण्याचा दावा ट्रम्प यांनी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी काश्मीर मुद्यावर अशीच मध्यस्थीची ऑफर दिली होती पण भारताने ती स्पष्टपणे नाकारली आहे......
0 टिप्पण्या