🌟पुर्णा शहरात तिरंगा बाईक रॅली काढून 'ऑपरेशन सिंदूर' मधील सैन्याच्या शौर्याला सलाम.....!


🌟छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माजी सैनिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात🌟


पुर्णा
:- देशभरात तिरंगा यात्रेच्या माध्यमातून भारतीय सैन्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आयोजन करण्यात येत असून पुर्णा शहरात देखील आज बुधवार दि.२१ मे रोजी सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात एकत्रित होऊन देशभक्त नागरिकांनी भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माजी सैनिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली

 मातृभूमीच्या रक्षणार्थ प्राणांची बाजी लावून पाकिस्तान सारख्या दहशतवादी देशाला धूळ चारणाऱ्या भारतीय सैन्याप्रति समर्थन करण्यासाठी देशाची एकात्म शक्ती तिरंग्याच्या साथीने सैन्याच्या पाठशी ठामपणे उभी असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी शहरातील माझी सैनिक गणेश भाऊ कदम, मन्नुसिंह ठाकूर ,शंका डहाळे ,सोमनाथ काकडे यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी लक्ष्मीकांत (बाळू )कदम ,डॉक्टर अजय  ठाकूर ,नितीन कदम हरिभाऊ कदम हनुमान शेठ अग्रवाल ,राजेश भालेराव, दयाल ओझा, एकनाथ काळबांडे काका, विष्णू कमलू प्रताप कदम,अनंतरावजी ईश्वर पारडे परवे ,बळीरामजी कदम, गोविंद राज ठाकर,प्रशांत कापसे, सुनील डुबीवार , राजेश धूत, राम पुरी, नाना चिटणीस,भारत ऐकलरे बाबा ठाकूर,प्रभाकर कोर्टावर, राजू महाजन, गजानन कदम, अबनराव पारवे संतोष पळसकर ,गोविंद ठाकूर, विश्वनाथ होळकर ,निलेश आगलावे  ,ईश्वर ठाकूर ,किशोर सूर्यवंशी ,हर्षल महाजन,अनिल बागल जयसिंग चंदन सदानंद पारडे आदी पूर्णा शहरातील देशभक्त नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते या तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन लक्ष्मीकांत ( बाळू )कदम गोविंद राज ठाकर यांनी केले होते........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या