🌟पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात स्कूलबसवर बॉम्ब हल्ला ४ जण ठार.....!

 


🌟या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही🌟

इस्लामाबाद/कराची : पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका शाळेच्या बसवर करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात पाच जण ठार झाले असून त्यामध्ये चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर ३८ जण जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना बलुचिस्तान प्रांतातील खुजदार जिल्ह्यात हा हल्ला झाला या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही.

परंतु बलोच फुटीरतावाद्यांनी हा हल्ला केला असल्याची शक्यता आहे कारण त्यांच्याकडूनच सातत्याने स्थानिक आणि लष्कराला लक्ष्य केले जात आहे पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि मुलांच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त केला. बलुचिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून बंडखोरी सुरू आहे, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीसह (बीएलए) अनेक फुटीरतावादी गट हल्ले करत आहेत. अमेरिकेने २०१९ मध्ये 'बीएलए'ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते.

या हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत तपासासाठी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. सकृतदर्शनी हा आत्मघातकी हल्ला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांना क्वेट्टा आणि कराचीतील रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या