🌟हिंगोलीत ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या स्मृती दिनी अभिवादन....!


🌟यावेळी बिंदू माधव जोशींचे छायाचित्र असलेल्या कॅलेंडरचे देखील वितरण करण्यात आले🌟


हिंगोली
:- हिंगोली जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेच्या वतीने ग्राहक चळवळीचे प्रणेते स्व.नामदार बिंदू माधव जोशी ह्यांच्या स्मृती दीना निमित्त १० मे रोजी अभिवादन सभा घेण्यात येवून बिंदू माधव जोशींचे छायाचित्र असलेल्या कॅलेंडर चे वितरण करण्यात आले.सर्वप्रथम  ग्राहक तीर्थ स्व.बिंदू माधव जोशी ह्यांच्या  प्रतीमेस जिल्हाध्यक्ष ॲड आर एन अग्रवाल ह्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.तदनंतर पदाधिकारी पत्रकार डॉ.विजय निलावार,एस.बी.रांजुलवार,ॲड.शोएब,वामनराव टाकलगव्हानकर, एम.एम.राऊत,परसराम हेंबडे व्हीं पी फुलताम्बकर,आदींनी पुष्पांजली अर्पण केली.प्रास्ताविकात पत्रकार डॉ विजय निलावार ह्यांनी स्व.बिंदू माधव जोशी ह्यांनी आजीवन ग्राहक कल्याणकारी कार्य करून ईतीहास नोंदवला असे म्हंटले.विशेष म्हणजे  ग्राहक संबंधी चळवळ,त्यांचे अधिकार,  कायदा,जागृती, प्रबोधन, ग्राहक संरक्षण परिषद,  ची आयुधे कायदेशीर सविनय पद्धतीने वापरून ग्राहक पंचायत महाराष्ट्रला राजमान्यता, लोकमान्यता मिळवून दिली.अस जिल्हाध्यक्ष ॲड आर एन अग्रवाल म्हणाले. ग्राहक चळवळीचे जनक भीष्म पितामह, साधकांवर पुत्रवत प्रेम करणारे पूजनीय ग्राहकतीर्थ  बिंदूमाधव जोशी "नानांच्या" स्मृतीस नमन करण्याचा हा स्मृती दीन पथदर्शक ठरतो असे उदगार  एस बी रांजुलवार ह्यांनी काढले.

ग्राहकांचे हक्कासाठी  शासन आणि ग्राहक ह्यांच्यात संवाद  साधुन ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या माध्यमातून  कर्तव्य आणि जागृती करण्यासाठी स्व.बिंदू माधव जोशी नी दिलेले धडे अंगीकृत  करणे हीच खरी त्यांना आदरांजली आहे अश्या आशयाचे उदगार एम एम राऊत व परसराम हेंबाडे ह्यांनी काढून सर्वांनी दोन मिनिट स्तब्ध होवून श्रदांजली अर्पण केली.उपस्थितांना स्व.बिंदू माधव जोशी ह्यांचे छायाचित्र असलेल्या कॅलेंडरचे वितरण करण्यात आले.संचालन वामनराव टाकळगव्हाणकर तर आभार ऍड शोएब ह्यांनी मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या